ताज्याघडामोडी

हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी वैज्ञानिकांनी शोधले औषध

संशोधकांनी अशा औषधाचा शोध लावला आहे जे हार्ट अटॅक आणि हार्ट फेलच्या धोक्यापासून बचाव करते. हे औषध हार्ट फेल होऊ नये यासाठी घेण्यात येणाऱ्या औषधांची गरज देखील संपवते. सर्वसाधारणपणे एकदा हार्ट अटॅक आल्यावर रूग्ण आयुष्यभर औषध घेत असतो, मात्र त्याचा काहीही परिणाम होत नाही. अशा परिस्थित वैज्ञानिकांनी शोधलेले हे औषध फायदेशीर ठरणार आहे.

हे औषध आपल्या शरीरातील बॉडी क्लॉकप्रमाणे कार्य करते. ज्याला सर्केडियन रिदम असेही म्हणतात. बॉडी क्लॉकमध्ये जीन आणि प्रोटीन असते, जे 24 तास हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर नियंत्रित करते. बॉडी क्लॉकचे तंत्र रक्त प्रवाह नियंत्रित ठेवते.

युनिवर्सिटीचे संशोधक टॅमी मार्टिनो यांनी सांगितले की, हा शोध खरंच रोमांचकारी होता. यामुळे हार्ट अटॅक देखील ठीक होऊ शकतो, तसेच हार्ट फेलचा धोका देखील टाळता येतो.

त्यांनी सांगितले की, एसआर 90009 नावाच्या या औषधांचे उंदरांवर परिक्षण करण्यात आले आहे. उदंरांच्या शरीरातील एनएलआरपी 3 इनफ्लेमेसम नावाचे सेल्युलर सेंसरची निर्मिती कमी झाली. हे सेंसर ह्रदयाच्या टिश्यूजला नुकसान पोहचवते. उंदरांच्या ह्रदयाला काहीही नुकसान झाले नाही.

यावरून स्पष्ट होते की, या औषधामुळे ह्रदयाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नसून, याचा परिणाम देखील खूप जलद होत आहे. हा शोध नेचर कम्युनिकेशन बायोलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *