गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिवसेना खासदार राजेंद्र गावितांना एक वर्षाचा तुरुंगवास, पावणे दोन कोटीचा दंड

महाविकास आघाडी सरकारमधील शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना एका प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर आता शिवसेनेचा नेता अडचणीत सापडला आहे. कोर्टाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनवली आहे.

पालघरमधील शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटी 75 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चेक बाऊन्स केस प्रकरणात पालघर कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना एका प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या अडचणीत वाढ जाली आहे. राजेंद्र गावित यांना पालघर जिल्हा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटी 75 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

खासदार राजेंद्र गावित यांच्या विरोधात एका जमिनीच्या व्यवहार प्रकरणी 8 ऑक्टोंबर 2014 मध्ये पालघर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे चिराग बाफना यांनी दावा दाखल केला होता. त्या दाव्याचा निकाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विक्रांत खंडागळे यांनी दिला असून त्यानुसार पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्ष शिक्षा आणि 1 कोटी 75 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे.

शिवाय या संदर्भात खासदार राजेंद्र गावित यांना अपिल करून निकालाविरोधात स्थगिती आणण्याची मुभा देण्यात आली आहे. खासदार राजेंद्र गावित यांनी याप्रकरणी कोर्टात दाद मागितल्याचीमाहिती मिळाली आहे. याप्रकरणी न्यायालयाने एक महिन्याची स्थगिती दिल्याचेही वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार 14 मार्च 2022 रोजी याप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *