पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कुरापती करण्याचा मानस असल्याचा आशय असलेली पोस्ट एका सराईत गुन्हेगाराने फेसबुकवर टाकली. त्यावर त्याच्या एका चेल्याने त्याच आवेशात कमेंट देखील केली. मात्र या दोघांना आणि कथित भाईचे फेसबुक हँडल करणाऱ्या एकाला ही पोस्ट चांगलीच महागात पडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली. त्यामुळे पोस्ट टाकणाऱ्या भाईचा वाढदिवस चक्क पोलीस कोठडीत गेला. […]
ताज्याघडामोडी
कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरला मारहाण, हॉस्पिटलची तोडफोड; गुन्हा दाखल
कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड करत डॉक्टरांनाही मारहाण केली. नगरमधील तारकपूरच्या सिटी केअर हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज तानाजी गडाख आणि रोहन बाबासाहेब पवार (दोघेही रा. टाकळीकाझी, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ. राहुल अरुण ठोकळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. […]
बनावट नोंद प्रकरणी तलाठी,मंडल अधिकारी यांना खातेनिहाय चौकशीची नोटीस
पतीच्या निधनानंतर वारस म्हणून कायदेशीर पत्नी आणि मुलांची नावे न लावता बनावट प्रतिज्ञापत्र आणि खोटी कागदपत्रे वापरून संगनमताने अनधिकृत महिलेचे नांव सात बारा उतारावर लावल्याप्रकरणी तलाठी आणि मंडल अधिकारी यांना निलंबित करून खातेनिहाय चौकशी का करू नये,याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे.त्यामुळे महसूल खात्यात खळबळ उडाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथील शेतकरी बसवराज तोरणगी यांच्या निधनानंतर […]
आंबे येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपुर तालुका पोलिसांची कारवाई
१५ एप्रिल पासून राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली,पोटनिवडणुकीच्या बंदोबस्त संपतो नाही तो पर्यंत पंढरपूर उपविभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी पुन्हा बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडावी लागत आहे.महसूल प्रशासनाचा फारसा धाक नसलेले वाळू चोर पोलीस कर्मचारी व्यस्त असल्याची संधी साधत पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत असून गेल्या महिनाभरात उपभागीतील चारही पोलीस […]
71 वर्षीय जैन मुनींनी मंदिरातच घेतला गळफास, प्रचंड खळबळ
एका जैन मुनींनी मंदिराच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील घाटकोपरमध्ये घडली आहे. गुरुवारी (दि. 20) पहाटेच्या सुमारास ही घटना समोर आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मनोहर लाल मुनी महाराज (वय 71) असे आत्महत्या केलेल्या मुनीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महाराजांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. […]
SBI च्या सर्व ग्राहकांची UPI सह डिजिटल सेवा दोन दिवस राहणार बंद
नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देशभरातील आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी गुरूवारी सूचना जारी केली आहे. यामध्ये बँकेची डिजिटल सेवा काही काळासाठी बंद राहण्याविषयी सांगितले गेले आहे. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व खातेधारकांनी लवकर कामे उरकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 21 ते 23 मे पर्यंत SBIच्या डिजिटल सेवा बंद SBIने आपल्या अधिकृत […]
धक्कादायक घटना! माजी सरपंचानेच केला तरूणाचा खून
मोकळया प्लॉटवर लाईट आणि इतर सुविधा उपलब्ध न करून दिल्यामुळे शिवीगाळ केल्याचा राग आल्यामुळे एका माजी सरपंचाने साथीदाराच्या मदतीने तरूणाचा खून केल्याची घटना उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांनी कात्रजमधील मांगडेवाडीतील खूनाची उकल केली आहे. विकास रमेश चव्हाण (रा. गुजरवस्ती, कात्रज माजी सरपंच पेजरवाडी, भोर) आणि सचिन जालिंदर डाकले (रा. उत्कर्ष सोसायटी कात्रज ) अशी अटक […]
तिसरा डोस फुलप्रूफ! Covishield च्या तिसऱ्या बूस्टर डोसनं कोरोनाच्या प्रत्येक स्ट्रेनपासून होणार बचाव
नवी दिल्ली, 20 मे : ऑक्सफर्ड अॅस्ट्राजेनकाच्या कोविशिल्ड या covid-19 रोगावरील लसीच्या तिसऱ्या बूस्टर डोसमुळं अधिक चांगल्या प्रकारे आजारापासून संरक्षण मिळणार आहे. या डोसमुळं कोरोनाच्या सर्व स्ट्रेनपासून बचाव करण्यास सक्षम बनतं. एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. हा अहवाल अद्याप प्रकाशित झालेला नाही. भारतासह इतर अनेक देशांमध्ये या लसीचे सध्या प्रत्येक व्यक्तीला दोन डोस […]
पंढरपूर शहरात व तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत आज पुन्हा चिंताजनक वाढ
पंढरपुर शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येने काल वर्षभरातील सारे उचांक मोडीत काढले होते.एकाच दिवशी आलेल्या ५ पेक्षा जास्त पॉझिटिव्ह फिगरमुळे नागिरकांमधून चिंता व्यक्त होण्याबरोबरच पुढील दहा दिवस कडक लॉकडाऊनचा प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत होती.आज आलेल्या अहवालात पुन्हा ३५२ व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून पंढरपुर शहरात १०२ तर तालुक्यात 250 […]
कोरोनाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त, 13 तासांच्या आत आई-वडील आणि मुलाचा मृत्यू
मुंबई : कोरोनाचा राज्यात हाहाकार दिसून येत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण असलेले महाराष्ट्र राज्य हे पहिले ठरले आहे. कोरोनामुळे येथे मोठ्या प्रमाणात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कोरोनाचे थैमान सुरु आहे. कोरोनामुळे अख्ये कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. अशीच एक धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. कोविड -19मुळे 13 तासात एकाच कुटुंबातील तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. […]