गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आंबे येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपुर तालुका पोलिसांची कारवाई

१५ एप्रिल पासून राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली,पोटनिवडणुकीच्या बंदोबस्त संपतो नाही तो पर्यंत पंढरपूर उपविभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी पुन्हा बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडावी लागत आहे.महसूल प्रशासनाचा फारसा धाक नसलेले वाळू चोर पोलीस कर्मचारी व्यस्त असल्याची संधी साधत पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत असून गेल्या महिनाभरात उपभागीतील चारही पोलीस ठाण्याअंतर्गत पोलिसांनी जवळपास २० ठिकाणी कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आज गुरुवार दिनांक २० रोजी सकाळी पंढरपूर तालुकयातील आंबे येथून अवैध वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याची माहिती या प्रकरणातील फिर्यादी पो.कॉ.हेमंत भराटे यांच्यासह पो.हे.कॉ.काळे ,पो.कॉ.बाबर यांना नेपतगाव येथे वेताळ देवस्थान यात्रेच्या माहितीसाठी गेले असता मिळाली.त्यावेळी सदर पोलीस कर्मचारी हे चळे गावचे हाद्दीतील भास्कराव अंबादास मोरे यांचे शेताजवळ रस्त्यावर गेले असता समोरून एक टिपर येताना दिसला. संशय आल्याने आम्ही त्यास हात करून थांबविण्याचा इशारा केला असता टिपर चालकाने पोलीस आहे हे ओळखुन टिपर जागेवर थांबवुन टिपरमधुन खाली उतरून रोडचे शेजारी शेतामधुन पळु काढला . सदर टिपर आरटीओ रजि. नं MH-09,BC-9556 ची पाहणी केली असता असा असुन त्याचे पाठीमागे हौदात पाहिले असता तो वाळूने भरलेला आढळून आला.सदर टिपर वाळूसह ताब्यात घेण्यात आला आहे.
या प्रकरणी चालक केशव मसु कांबळे रा आंबे ता पंढरपुर व मालक नाव पत्ता माहित नाही यांचेविरूध्द भादवि कलम 379,34 सह गौण खनिज कायदा 1978 चे कलम 4(1),4(क)(1), व 21 प्रमाणे पो.कॉ.हेमंत भराटे यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *