नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशात कोविडमुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत केली पाहिजे, अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली असून त्यावर कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस जारी करीत आपली भूमिका स्पष्ट करण्याची सूचना केली आहे. कोविडमुळे मरण पावलेल्यांना जी मृत्यूप्रमाणपत्रे दिली जातात त्यात एकसमानता असण्याची गरजही कोर्टाने व्यक्त केली आहे. […]
ताज्याघडामोडी
करोनाची दुसरी लाट ओसरली; पुढील आठवड्यापासून अनेक राज्यांमध्ये सुरू होणार ‘अनलॉक’ प्रक्रिया
नवी दिल्ली – मागील काही दिवसांत देशात करोनाने तैमान घातलं होतं. देशात लाखोंच्या संख्येने रुग्ण वाढत होते. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. राज्यांच्या लॉकडाऊनच्या निर्णयाला यश आले असून देशातील नव्या रुग्णांची संख्या घटली आहे. करोनाची दुसरी लाट ओसरल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी लॉकडाऊन हटविण्याचे संकते दिले आहेत. दिल्ली, मध्य प्रदेश आणि […]
कोरोना अपडेट : आजच्या अहवालाने शहर तालुक्यास मोठा दिलासा
आज दिनांक २४ मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालाने पंढरपुर शहर व तालुक्यास थोडासा दिलासा दिला असून पंढरपूर शहरात १३ तर तालुक्याच्या ग्रामीण भागात ५० व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर आजच्या अहवालानुसार ३ व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे.गेल्या तीन दिवसात शहर व तालुक्यातील उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मात्र मोठी घट झाली आहे.आज २४ मे […]
निर्दयी बापानं पोटच्या २ मुलांची दगडाने ठेचून केली हत्या, नंतर मृतदेह फेकले विहिरीत, स्वत:चाही कापला गळा
पोटच्या दोन मुलांना दगडान ठेचून त्यांचा खून करुन मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुंदेलखंडच्या झाशी जिल्ह्यात रानीपूर येथे घडली आहे. त्यांनतर या व्यक्तीनं स्वत:चा गळा कापून विहीरत उडी घेतली. कौटुंबिक वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती द्वारे समोर आले आहे. रहिश असे पित्याचे नाव असून हर्ष (वय १२), […]
आरक्षणाचे जनक शाहूंचा आशीर्वाद घेऊन संभाजीराजे मोहिमेवर, मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा सुरु
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद घेऊन भाजप खासदार संभाजी छत्रपती आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या भावना जाणून घेणार आहेत. त्यानंतर येत्या 27 मे रोजी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षनेते आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहेत. संभाजी छत्रपती यांनी आज कोल्हापूर […]
धक्कादायक प्रकार! बिलाच्या वसुलीपोटी रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र केलं जप्त
कोरोना महामारीच्या संकटात काही खासगी रुग्णालयं रुग्णांच्या नातेवाईकांना लुबाडत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या सगळ्या घटना ताज्या असतानाच बुलडाण्याच्या खामगावात संतापजनक घटना समोर आली आहे. बिलमध्ये 11 हजार रुपये कमी पडत होते म्हणून रुग्णालय प्रशासनाने थेट रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जोपर्यंत 11 हजार रुपये किंवा मंगळसूत्र देत नाही […]
कुटूंबातील वादातून मुबंईत आमदाराच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
पुलाच्या कठड्यावर चढून आत्महत्येच्या तयारीत असलेल्या एका महिलेचे प्राण वाहतूक शाखेच्या एका दक्ष कर्मचाऱ्यामुळे वाचले असून आत्महत्येचा प्रयत्न करणारी हि महिला एका आमदाराची पत्नी असल्याची माहिती पुढे आली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मानखुर्द पोलीस वाहतुकीचं (Mankhurd traffic police) नियोजन करत होते. त्याचवेळी एका दुचाकी चालकानं एका महिला […]
‘ह्या’ ठिकाणी १ जूननंतर लाॅकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता !
लाॅकडाऊन नंतर महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. पण कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे प्रशासनाकडून लाॅकडाऊन बद्दल अतिशय सावधगिरीने निर्णय घेण्यात येणार आहे. १ जून नंतर लाॅकडाऊन वाढणार की लाॅकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल होणार किंवा त्यामध्ये काही बदल केले जाणार याबद्दल सर्वसामान्य […]
सुनेनं केला सासूचा खून, पत्नीला वाचविण्यासाठी लेकानं केलं असं काही
राग अनावर झाल्याने सुनेने सासुचा ब्लाऊजच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हा प्रकार तळेगाव शहरातील टेल्को हाऊसिंग सोसायटीत घडली आहे. सासू-सुनेच्या भांडणातून सुनेने हे टोकाचे पाऊल उचलले असून यामध्ये पतीचाही सहभाग आहे. बेबी शिंदे असे खून झालेल्या सासूचे नाव असून पूजा शिंदे (सून), मिलिंद शिंदे (पती) असे आरोपीची नावे आहेत. या […]
आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटली; डॉक्टरला बेदम मारहाण
करोनाच्या पहिल्या लाटेतून विश्रांती मिळतेन् मिळते तोच दुसऱ्या लाटेनं डोकं वर काढलं. त्यामुळे पहिल्या फळीतील कोविड योद्धे असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आला आहे, असं असलं तरी दुसरीकडे डॉक्टरांवर हल्ले होत असल्याच्या घटनाही सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना विरार पूर्वमध्ये घडली आहे. येथे असलेल्या बालाजी रुग्णालयात एका रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट करताना […]