आज दिनांक २४ मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालाने पंढरपुर शहर व तालुक्यास थोडासा दिलासा दिला असून पंढरपूर शहरात १३ तर तालुक्याच्या ग्रामीण भागात ५० व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर आजच्या अहवालानुसार ३ व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे.गेल्या तीन दिवसात शहर व तालुक्यातील उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मात्र मोठी घट झाली आहे.आज २४ मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार सद्या २०१७ कोरोना बाधित उपचार घेत आहेत.
