ताज्याघडामोडी

करोनाची दुसरी लाट ओसरली; पुढील आठवड्यापासून अनेक राज्यांमध्ये सुरू होणार ‘अनलॉक’ प्रक्रिया

नवी दिल्ली – मागील काही दिवसांत देशात करोनाने तैमान घातलं होतं. देशात लाखोंच्या संख्येने रुग्ण वाढत होते. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. राज्यांच्या लॉकडाऊनच्या निर्णयाला यश आले असून देशातील नव्या रुग्णांची संख्या घटली आहे. करोनाची दुसरी लाट ओसरल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी लॉकडाऊन हटविण्याचे संकते दिले आहेत.

दिल्ली, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश राज्यांनी संकेत दिले असून रुग्णसंख्येत होणारी घट कायम राहिली तर राज्यांत अनलॉक प्रक्रियेला सुरुवात करण्यात येईल. दिल्लीतील लॉकडाऊन एक आठवड्यासाठी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत राहणार आहे.

आता रुग्णसंख्या घटत असून ही स्थिती कायम राहिली तर दिल्लीत अनलॉक प्रक्रिया सुरू कऱणार असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. दिल्लीतील करोना पॉझिटीव्ह रेट ३६ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. तो आता २.५ टक्क्यांवर आला आहे.

महाराष्ट्रातही करोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. महाराष्ट्र सरकारकडून १४ एप्रिलपासून सुरू झालेल्या ब्रेक द चेन महिमेला चांगलं यश आलं. त्यामुळे आता लॉकडाऊन शिथील करण्यात येईल असे संकेत मिळत आहे. रविवारी राज्यात २६ हजार ६७२ नवीन रुग्ण आढळून आले होते.

दुसरीकडे मध्य प्रदेशात शिवराज सिंह सरकारने अनलॉक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. ही प्रक्रिया पाच जिल्ह्यांपासून करण्यात आली आहे. करोना पॉझिटीव्हीटी रेट कमी असलेल्या जिल्ह्यातच अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. येथे ब्लॅक फंगसची प्रकरणं वाढले असून राज्य सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम शहरात दिसत आहे. मात्र ग्रामीण भागातील स्थिती चिंताजनक आहे. मात्र ज्या भागात ब्लॅक फंगसचे प्रकरणं कमी आहेत, तिथे अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात येऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *