ताज्याघडामोडी

रस्त्यावर ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; ७ किलोमीटर पाठलाग करून टोळक्याने तरुणाला संपवलं

एकीकडे संपूर्ण राज्यभरात होळीचा सण साजरा केला जात असताना दुसरीकडे खुनाच्या घटनेने नाशिक हादरलं आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात एका तरुणाची भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिकमधील शनी मंदिर परिसरातील रहिवासी असलेला किरण गुंजाळ (२७) याची दिंडोरी नाक्यावर असलेल्या […]

ताज्याघडामोडी

डॉ.द.ता.भोसले सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

इसबावी (पंढरपूर) येथील डॉ.द. ता. भोसले सार्व.वाचनालय इसबावी येथील वाचनालयाचा पुरस्कार  वितरण सोहळा संतराज मठ इसबावी  येथे ज्येष्ठ साहित्यिक  डॉ.द.ता.भोसले यांचे अध्यक्षतेखाली म.सा.प.पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, मनोरमा परिवाराचे अध्यक्ष श्रीकांत मोरे, सांगोला मसाप अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी चेअरमन अभिजीत पाटील, चेअरमन कल्याणराव काळे, जिल्हा परिषद सदस्य […]

ताज्याघडामोडी

बायकोला मारलं, मग तुकडे करुन पाण्याच्या टाकीत लपवलं, दोन महिन्यांनी भयंकर गुन्ह्याची उकल…

छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये एका तरुणाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतक्यावरत तो थांबला नाही तर त्याने मृतदेहाचे अनेक तुकडे करून पाण्याच्या टाकीत टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने हा मृतदेह तब्बल दोन महिने पाण्याच्या टाकीत लपवून ठेवला होता आणि कोणाला याची कल्पनाही नाही. बिलासपूरच्या उसलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पत्नीचे […]

ताज्याघडामोडी

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढले, नंतर अत्याचार केला, गर्भवती होऊनही मारहाण

लग्नाचे अमिष दाखवून प्रेयसीवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडल्याचे अनेक वेळा कानावर आले आहे. लग्न करण्याचे अमिष दाखवून तरुणींवर अत्याचार केला जातो. परंतु नाशिकमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे अल्पवयीन प्रेयसीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिच्यावर अमानुष अत्याचार करत तिला गर्भवती देखील केले आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ […]

ताज्याघडामोडी

माझी राजकीय कारकीर्द तुमच्यापेक्षा मोठी आहे; रवींद्र धंगेकरांनी रासनेंना सुनावलं

कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा दारुण पराभव केला आहे. कसब्यातील या प्रतिष्ठेच्या लढाईत रासने आणि धंगेकर यांनी एकमेकांवर टीकेच्या जोरदार फैरी झाडल्या होत्या. निकालानंतर देखील या दोन्ही नेत्यांचे शाब्दिक युद्ध सुरूच आहे. निकालानंतर रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. ‘आज सत्तेत असल्याने लोक त्यांना […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चपलांची रॅक पॅसेजमध्ये का ठेवली? नवरा-बायकोच्या बेदम मारहाणीत शेजाऱ्याचा मृत्यू

इमारतीच्या कॉमन पॅसेजमध्ये चपलांची रॅक ठेवण्यावरुन झालेल्या भांडणात एका ५४ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मीरारोडमध्ये घडली आहे. मीरारोड येथील अस्मिता डॅफोडिल्स कॉम्प्लेक्समध्ये हा प्रकार घडला. या इमारतीच्या बी विंगमध्ये चौथ्या मजल्यावर रुपानी आणि खत्री कुटुंबीय राहतात. त्यांचे फ्लॅटस एकमेकांसमोर आहेत. या दोन्ही घरांच्या मधील भागात असणाऱ्या कॉमन पॅसेजमध्ये खत्री कुटुंबीयांनी चपलांची रॅक ठेवली होती. […]

ताज्याघडामोडी

हताश भाषणावर आणि टोमण्यांवर प्रतिक्रिया देणं…’, उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची देवेंद्र फडणवीसांकडून खिल्ली

उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील आक्रमक भाषणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या सभेतून काहीही नवीन मिळालेलं नाही. ते तेच तेच बोलले आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही, असे ते म्हणाले. तेच शब्द, तीच वाक्य, तेच टोमणे, काहीही नवीन या […]

ताज्याघडामोडी

गावातल्या तरुणाचा धक्का लागला, डोक्यात तिडीक, कुटुंबाने पोराचा जीवच घेतला

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एक हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातल्या विरवाडे गावातील एका तरुणाचा त्याच्याच गावातील तरुणाला धक्का लागला. या वादातून मुलासह त्याच्या कुटुंबातील पाच जणांनी तरुणाच्या घरी जाऊन चाकूने भोसकून तरुणाची हत्या केल्याची घटना २ मार्च रोजी रात्री घडली. या प्रकरणी शुक्रवारी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन एका महिलेसह पाच जणांना […]

ताज्याघडामोडी

बारावीचा गणिताचा पेपर कसा फुटला, १२ हजारांना विक्री, पोलिसांनी डिलीट केलेला व्हॉट्सॲप ग्रूप शोधला

बारावीच्या पेपर फुटी प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. आतापर्यंतच्या तपासावरुन एका मोठ्या रॅकेटंतर्गत गणिताचा पेपर फोडण्यात आल्याचे दिसत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा पोलिस ठाणे हद्दीतील राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय व भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाहेरून पेपर सुरू होण्याआधी अर्धा तास अगोदर गणिताच्या पेपरची दोन पाने व्हाटसअपवर व्हायरल झाली होती. […]

ताज्याघडामोडी

एक काळी टोपीवाला होता.., उद्धव ठाकरे यांचा कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कोश्यारी यांनी राज्यपाल असताना अनेकदा सावित्रीबाई आणि महात्म फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधानं केली होती. हा दोरा धरुन उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला. उद्धव ठाकरे हे खेडमधील […]