ताज्याघडामोडी

डॉ.द.ता.भोसले सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

इसबावी (पंढरपूर) येथील डॉ.द. ता.
भोसले सार्व.वाचनालय इसबावी येथील वाचनालयाचा पुरस्कार  वितरण सोहळा संतराज मठ इसबावी  येथे ज्येष्ठ साहित्यिक  डॉ.द.ता.भोसले यांचे अध्यक्षतेखाली म.सा.प.पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, मनोरमा परिवाराचे अध्यक्ष श्रीकांत मोरे, सांगोला मसाप अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी चेअरमन अभिजीत पाटील, चेअरमन कल्याणराव काळे, जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख, माजी चेअरमन भगीरथ भालके, विठ्ठल हॉस्पिटलचे अध्यक्ष युवराज पाटील, कृषिराज कारखाना भोसे चेअरमन गणेश पाटील, मसापचे जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, जे.जे.कुलकर्णी, मर्चंट बँकेचे अध्यक्ष नागेश भोसले, मंगळवेढाचे डॉ.सुभाष कदम, कमल तोंडे, नगरसेवक प्रशांत शिंदे, विशाल मलपे आदी मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी सौ.सुनिताराजे पवार (संस्कृती प्रकाशन, पुणे), ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र दास, जेष्ठ कवी प्रकाश जडे यांना डॉ.द.ता. भोसले जिव्हाळा साहित्यसेवा पुरस्कराने गौरविण्यात आले. तर कादंबरीसाठी ज्येष्ठ कवी लेखक गोविंद काळे,  ज्ञानेश्वर जाधवर, शिवाजीराव बागल… कवितासंग्रहासाठी मारुती कटकधोंड,  डॉ.स्मिता पाटील, डॉ.कविता मुरूमकर… कथासंग्रहासाठी प्रा.सीताराम सावंत, गणपत जाधव, हरिश्चंद्र पाटील तर ललित गद्य साहित्य पुरस्कार सुनील जवंजाळ, सचिन वायकुळे यांना डॉ. द.ता. भोसले जिव्हाळा साहित्य पुरस्काराने मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
   यावेळी संस्कृती प्रकाशनने प्रकाशित केलेल्या “कल्यांणमस्तू!” कल्याणराव शिंदे सेवापूर्ति गौरव ग्रंथाचे प्रकाशन व राष्ट्रयुवा चेतनाच्या कल्याणराव शिंदे सेवापुर्ती गौरव विशेषांकाचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.
पुरस्कार निवड समिती सदस्य प्रा डॉ. रमेश शिंदे, संपादक धनाजी चव्हाण, डॉ.प्रशांत ठाकरे यांचा सत्कार डॉ.द.ता.भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. “कल्यांणमस्तू!”ग्रंथाच्या प्रकशिका सौ. सुनीतराजे पवार, मिलिंद जोशी, श्रीकांत मोरे, प्रबुद्धचंद्र झपके, भगीरथ भालके आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी पंढरपूर व परिसरातील अनेक मान्यवर मंडळी, नागरिक, नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालन साहित्यिक अंकुश गाजरे यांनी केले तर आभार साहित्यिक प्रा.भास्कर बंगाळे यांनी मानले.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिव्हाळा संस्थेचे विलास भोसले, प्रा.नवनाथ धावणे, लक्ष्मण शेळके, संभाजी अडगळे, सूर्याजी भोसले जेनुद्दिन मुलाणी, हनुमंत भोसले  आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *