शरद पवार यांच्या आवाजाची नकल करणाऱ्या व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात शरद पवार यांच्या नावे कॉल करणाऱ्या त्या व्यक्तीला शोधून काढण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. प्रशासकीय बदल्यांशी संबंधित प्रकरणांसाठी शरद पवार यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत त्या व्यक्तीने कॉल केला होता. पण शरद पवारांची नक्कल करणारी व्यक्ती […]
ताज्याघडामोडी
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कडून आ.समाधान आवताडे यांच्या मागण्यांना हिरवा कंदील
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कडून आ.समाधान आवताडे यांच्या मागण्यांना हिरवा कंदील प्रतिनिधी :मंगळवेढा पंढरपूर राज्य महामार्गापासून मंगळवेढा सांगोला पर्यंत बाह्यवळण रस्ता भूसंपादन करून विकसित करण्यासंदर्भात आ. समाधान आवताडे यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांची भेट घेवुन पत्रा व्दारे मागणी केली होती. मंगळवेढा आणि पंढरपूर ही दोन्ही शहरे तीर्थक्षेत्रे असल्याने आषाढी व कार्तिकी एकादशी दरम्यान […]
संजय गांधी निराधार,श्रावणबाळ सेवा योजनेतील 57 प्रकरणे मंजूर
संजय गांधी निराधार,श्रावणबाळ सेवा योजनेतील 57 प्रकरणे मंजूर पंढरपूर;(दि 12):- तहसिल कार्यालय पंढरपूर येथे तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत 57 प्रकरणे समीतीच्या सभेत मंजूर करण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे 31 प्रकरणे व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे 26 प्रकरणे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली. […]
मुंबईत १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थगित
मुंबईत १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र आता या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे. शालेय शिक्षण विभागाने १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या जीआरला सरकारने स्थगिती दिली आहे. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असून शाळा सुरु होण्यासाठी शासनाच्या नव्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागानं दोन दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग […]
पत्नीस माहेरी जाण्यापासून रोखले,पत्नीने पतीस झोपेतच दिले क्रिकेट बॅटचे फटके
कुटूंब म्हणले कि भाडणं आलेच,आणि ज्या संसारात पती-पत्नी एकमेकांशी भांडत नाहीत त्या संसारात काहीतरी उणीव आहे असे म्हटले जाते.संसार कितीही प्रेमाचा असला तरी भांड्याला भांडे लागण्याचे निमित्तही भांडण सुरु होण्यास कारणीभूत ठरते असे म्हटले जाते.भांडण झाले कि मग आदळआपट आली,रुसवा आला,पतिराजाच्या जेवणाची आबाळ आली आणि नंतर गोड समझोताही आलाच.पण एखादया वेळी किरकोळ कारणावरून सुरु झालेले भांडण विकोपाला जाते. […]
टायगर ग्रुप चे अध्यक्ष समाजरत्न पुरस्कार,2021 ने सन्मानित
पुणे येथे झालेल्या समाजरत्न पुरस्कार 2021 ह्या सोहळ्यात, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने सतत समाज उपयोगी होत असलेल्या कार्याची दखल घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य श्री राजेश जी पांडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागात चांगले काम करणाऱ्या शिलेदारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्यामध्ये टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.श्री.डॉ.तानाजी […]
महाराष्ट्रात दुकानं, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
महाराष्ट्रात दुकानं, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे महाराष्ट्र शासनाच्यावतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले. पण राज्यातील सर्व धार्मिकस्थळे आणि सिनेमागृह (थिएटर आणि मल्टिप्लेक्स) पुढील निर्णय जाहीर होईपर्यंत बंद राहणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. याआधीच कोरोना प्रतिबंधक लसचा दुसरा डोस घेऊन दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झाला […]
प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार
पंढरपूर दि. 11 :- सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा आणि माढा पाच तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढता आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी आज केले. सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे कोरोना निर्बंधाबाबत तालुक्यातील पदाधिकारी, […]
शिक्षकांकडून आर्थिक फसवणूक झाल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोट आली समोर
एका तरुणाने सुसाईड नोट लिहून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन पानांची सुसाईड नोट लिहून तरुणांने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विष घेतलेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू असून बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. हनुमान हरीराम गव्हाणे असं विष घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. आत्महत्येचा प्रयत्न […]
पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही- भगिरथ भालके
सध्या पंढरपूर ग्रामीण मध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मा.जिल्हाधिकारी,सोलापूर यांनी दि.१३ ऑगस्ट, २०२१ पासून पंढरपूर तालुक्यामध्ये (लॉकडाऊन) संचारबंदी लावण्याची तयारी दर्शविलेली आहे. याबाबत भगिरथदादा भालके यांनी आज दि.११.०८.२०२१ रोजी मुंबई येथे ना. जयंतराव पाटीलयांची समक्ष भेट घेऊन पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांच्या संख्येबाबत सविस्तर चर्चा करून तसे लेखी पत्रही दिले. त्यावर ना. […]











