ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही- भगिरथ भालके

सध्या पंढरपूर ग्रामीण मध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मा.जिल्हाधिकारी,सोलापूर यांनी दि.१३ ऑगस्ट, २०२१ पासून पंढरपूर तालुक्यामध्ये (लॉकडाऊन) संचारबंदी लावण्याची तयारी दर्शविलेली आहे.

याबाबत  भगिरथदादा भालके यांनी आज दि.११.०८.२०२१ रोजी मुंबई येथे ना. जयंतराव पाटीलयांची समक्ष भेट घेऊन पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांच्या संख्येबाबत सविस्तर चर्चा करून तसे लेखी पत्रही दिले.

त्यावर ना. जयंतराव पाटील यांनी मा.जिल्हाधिकारी, सोलापूर यांना त्वरीत फोन करून सूचना दिल्या की, पंढरपूर शहरात संचारबंदीसाठी तीव्र विरोध असेल तर पंढरपूर शहरातील सर्व लहान-मोठे व्यापारी, प्रतिष्ठीत नागरिक, सर्व पदाधिकारी यांचे समवेत त्वरीत मिटिंग घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून मगच संचारबंदी (लॉकडाऊन) चा तोडगा काढावा, जेणे करून व्यापारी व नागरिकांवर अन्याय होणार नाही.

सदर मंत्री महोदयांनी त्वरीत मा.जिल्हाधिकारी,सोलापूर यांना फोनवरून दिलेल्या सूचनांमुळे पंढरपूरातील व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. ज्याप्रमाणे आमदार स्व.भारतनाना हे नेहमीच पंढरपूर वासीयांच्या सोबत राहिले त्यांच्या नंतर मीही कायमच आपल्या सोबत राहिन. त्यामुळे व्यापाऱ्यांवर व इतर नागरिकांवर अन्याय होणार नाही असा विश्‍वासही श्री विठठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  भगिरथ भालके यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *