गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिक्षकांकडून आर्थिक फसवणूक झाल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोट आली समोर

एका तरुणाने सुसाईड नोट लिहून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन पानांची सुसाईड नोट लिहून तरुणांने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विष घेतलेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू असून बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. हनुमान हरीराम गव्हाणे असं विष घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाच्या खिशात सुसाईड नोट आढळली असून आत्महत्या करण्या मागचे कारण दिले आहे.

या प्रकरणात नातेवाइकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीड तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतमध्ये शिक्षक असेल राजेंद्र पाटील बुवा गाडे, विश्वंभर पाटील बुवा गाडे या दोघांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिली आहेत. या दोघांमुळे मी आत्महत्या करत आहे असं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की, राजेंद्र गाडे हा जिल्हा परिषद शिक्षक असून फक्त पगार उचलायला जातो.

2016 ते 2020 पर्यंत एकदिवस ही शाळेत गेला नाही, त्याच्या जागेवर 5000 हजार रुपये महिना देऊन दुसरा व्यक्ती काम करत आहे. वरिष्ठ अधिकारी यांना पैसे देऊन मॅनेज करतो असा आरोप सुसाईड नोटमध्ये हनुमानने केला आहे.राजेंद्र गाडे यांच्याकडे हनुमान गव्हाने हा कामाला होता. हनुमान गव्हाणे याला कामासाठी 25 हजार रुपये महिन्या प्रमाणे कामाला ठेवले.

ठरल्या प्रमाणे सर्व काम पूर्ण करून कंपनीने दिलेलं चेक देखील राजेंद्र गाडे यांना दिले. मात्र 14 महिने 8 दिवसाचा पगार व इतर व्यवहाराचे मिळून 867385 रुपये पैशे शिल्लक आहेत. मागील चार वर्षांपासून हे पैसे त्यांना मागत असून अद्यापपर्यंत पैसे दिले नाहीत. आज देतो उद्या देतो म्हणून फसवणूक करत आहे.

पैशे मागायला घरी घेल तर जीवे मारुन टाकण्याची धमकी देत आहेत त्याच्या कॉल रेकॉर्ड आहेत असे सुसाईडमध्ये लिहिले आहे. शेवटी कंटाळून राजेंद्र गाडे या शिक्षकांच्या घरासमोर विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न पीडित तरुणाने केला. विषारी औषध जास्त असल्यामुळे हनुमान अद्याप शुद्धीवर नाही. प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.

यासंदर्भात जिल्हा परिषद शिक्षक राजेंद्र काळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. फोनवर देखील मला काही बोलायचं नाही मी माझ्या परीने पाहतो म्हणत कॉल कट केला. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातमध्ये काम करणाऱ्या गुरुजीं शासनाचा पगार उचलून दुसरीकडे गुत्तेदारी करत असताना बेरोजगार तरुणाचा पैसे पडल्यामुळे या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

यामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात असून शाळेत न जाता पगार उचलणार्‍या गुरुजी वर कारवाई करण्याची मागणी देखील नातेवाईक करत आहेत तसेच उद्या हनुमानचे काही बरेवाईट झाल्यास राजेंद्र गाडे हे जबाबदार असतील असे देखील नातेवाईकांनी म्हटले आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *