गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शरद पवार यांच्या आवाजाची नकल करणाऱ्या व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश

शरद पवार यांच्या आवाजाची नकल करणाऱ्या व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात शरद पवार यांच्या नावे कॉल करणाऱ्या त्या व्यक्तीला शोधून काढण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. प्रशासकीय बदल्यांशी संबंधित प्रकरणांसाठी शरद पवार यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत त्या व्यक्तीने कॉल केला होता. पण शरद पवारांची नक्कल करणारी व्यक्ती शोधून काढण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आले आहे. मंत्रालयात मुख्य सचिवांच्या कार्यालयात या व्यक्तीने फोन करत आपण शरद पवार बोलत असल्याचे सांगितले होते. तसेच प्रशासकीय बदल्यांशी संबंधित हा कॉल होता असे गृह विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवरून बोलत असल्याचे सांगत या व्यक्तीने प्रशासकीय बदल्यांसाठी कॉल केला होता. पण या कॉलचा संशय आल्यानेच मंत्रालयातूनच सिल्व्हर ओकला अशा कॉलबाबतची विचारणा करण्यात आली. त्यामध्ये हा कॉल खोटा असल्याचे समोर आले. त्यानंतरच कॉलशी संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम कामाला लागली. मुंबईतील गावदेवी पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. तसेच मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने या प्रकरणात पुण्यातून एका व्यक्तीला ताब्यातही घेतले होते. या व्यक्तीसोबत आणखी दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवारी रात्रीच गावदेवी पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदवल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. या व्यक्तीविरोदात फसवणुकींचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने याच प्रकरणात केलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या व्यक्तीने शरद पवारांचा आवाज काढण्यासाठी कॉल स्पुफिंग एपचा वापर केला होता. या एपच्या वापरामुळे एखाद्या व्यक्तीचा आवाज बदलून काढता येणे शक्य आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याआधीच पुण्यातील चाकण परिसरात एका जमीन खरेदी व्यवहारात ९ ऑगस्ट रोजी अशाच एका प्रकरणात आवाजाचा दुरूपयोग करण्यात आला होता. या प्रकरणातही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सध्या गृहखाते आहे. तसेच दिलीप वळसे पाटील हे गृह खात्याचे मंत्री आहेत.

काय आहे प्रकरण ?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावे मंत्रालयात बुधवारी रात्री एक फोन आला. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरून हा फोन केला आहे अशी माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली. शरद पवारांचा आवाज काढत या व्यक्तीने मंत्रालयात कॉल केला होता. त्यामुळे काही काळासाठी मंत्रालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही या प्रकरणात शोधाशोध करत थेट सिल्व्हर ओकपर्यंत पडताळणीसाठी कॉल करण्याची वेळ आली. पण या कॉलची पडताळणी करण्यासाठी मंत्रालयातून सिल्व्हर ओकमध्ये फोन करण्यात आला. त्यानंतर हा फोन कॉल सिल्व्हर ओकमधून नसल्याचे स्पष्ट झाले. मंत्रालयातून या कॉलचा शोध घेण्यासाठी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *