पंढरपूर तालुक्यातील पंढरपुर शहरा चंद्रभागागेच्या तीरावर असलेल्या शेगाव दुमाला परिसरात अवैध वाळू उपशावर आता पर्यत वारंवार कारवाया होऊन देखील या परिसरातून होणारा अवैध वाळू उपसा काही थांबत नसल्याची चर्चा सातत्याने होताना दिसून येते.सोमवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील विशेष पथकाने या ठिकाणी भल्या पहाटे दोन ट्रॅक्टर डंपीग ट्रेलरद्वारे अवैध […]
Uncategorized
उजनी धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडा
गेल्या अनेक दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे.समाधान पाऊसही झालेला नाही.शेतकऱ्यांनी ऊस,फळबागा,खरीप पिके व चाऱ्याची पिके घेतली आहेत त्यांना पाण्याची कमतरता भासत आहे.तर अनेक गावच्या पाणी पुरवठा योजनांनाही पाण्याची कमतरता भासत आहे.उजनी धरणात सध्या ६२ टक्के उपयुक्त जलसाठा झालेला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेऊन उजनी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडण्यात […]
डॉक्टर पतीच्या प्रेमसंबंधास विरोध करणाऱ्या पत्नीस पंढरपुरात जीवे मारण्याची धमकी तर मुलीस मारहाण
एकफुल दो माली हा चित्रपट जुन्या जमान्यात प्रचंड गाजला होता पण वास्तव जीवनात दो फुल एक माली असेच चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळते.आणि यातून निर्माण झालेले वाद हे कधीकधी पोलीस ठाण्यात पोहोचतात.पंढरपूर शहरातही असाच एक प्रकार घडला असल्याचे दाखल गुन्ह्यावरून स्पष्ट होत असून एका डोळ्याच्या डॉक्टरचे एका महिलेशी प्रेम संबंध असून या प्रेमसंबंधास आक्षेप घेत […]
आ.आवताडे आणि आ.परिचारक यांनी घेतली अजितदादांची भेट
लस उपलब्धता वाढवावी यासाठी ना.राजेश टोपेंना भेटणार -आ. समाधान आवताडे सोलापूरचे जिल्हाधीकारी मिलिंद शंभरकर यांनी ९ ऑगस्ट रोजी आदेश काढत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या कारणावरून पंढरपूर शहर व तालुक्यातही १३ ऑगस्ट पासून संचार बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.या विरोधात पंढरपूर शहरातील छोटे मोठे दुकानदार,पथ विक्रेते,हॉटेल चालक यासह विविध आस्थापना चालकांनी संघटीपणे यास विरोध करण्यास सुरुवात केली असून सोमवारी शहरातील […]
शहीद पोलिस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने यांच्या जयंतीनिमित्त पुळूज येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
शहीद पोलिस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन पुळूज गावात करण्यात आले होते. यात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून एक आठवण व कोरोना काळात सामाजीक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न शहीद धनाजी व्हनमाने बहुउद्देशीय संस्था पुळूज च्या वतीने करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुळुज येथे आज या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी आपल्या मित्राची […]
फॅबटेक कॉलेजमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० या विषयावर वेबिनार संपन्न
सांगोला:येथील फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये राष्ट्रीय शेक्षणिक धोरण २०२० या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनार साठी प्रमुख मार्गदर्शन म्हणून केबीएन युनिव्हर्सिटी कलबुर्गी येथील डॉ. विशालदत्त कोहीर ऑनलाईन उपस्थित होते. त्यांचे स्वागत महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. साहेबगौडा संगनगौडर यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांना फॅबटेक महाविद्यालया बद्दलची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. […]
फॅबटेकच्या अमोल शिंदे या विद्यार्थ्यांची सेडिमॅक मेकॅट्रॉनिकक्स या नामांकित कंपनीमध्ये निवड
सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या अमोल शिंदे या विद्यार्थ्यांची सेडिमॅक मेकॅट्रॉनिकक्स पुणे या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली. सेडिमॅक मेकॅट्रॉनिकक्स हि कंपनी लहान पॉवर ट्रेन ,मोटर जेनेरेटर तयार करत असून भारतातील मेकॅट्रॉनिकस क्षेत्रातील अग्रगण्य […]
पंढरपूरकरांसाठी कोवॅक्सिन लसीचे ६०० डोस मिळणार
गेल्या काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यास कोविशील्ड लसीबरोबरच कॅव्हॅक्सिन लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होण्यास सुरुवात झाली असून १८ वर्षावरील वयोगटासाठी हि लस उपलब्ध करून देण्यात येत आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी शीतलकुमार जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक १० ऑगस्ट रोजी पंढरपूर शहर व तालुक्यासाठी कोवॅक्सिन लसीचे ६०० डोस उपलब्ध करण्यात येणार असून पंढरपुर शहर व करकंब आरोग्य […]
पंढरपूरकरांचे टेन्शन वाढले
मार्च महिन्याच्या सुरुवातीस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस राज्यात सुरुवात झाली अशातच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आणि पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजविण्यास सुरुवात केली.शहरातील सर्वच कोविड हॉस्पिटलमधील बेड फुल्ल झाले आणि कोरोना बाधितांना उपचारासाठी अक्षरश सांगली कोल्हापूर कडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणे भाग पडले.मे महिन्याच्या सुरुवातीस तर दरदिवशी ५०० शेच्या आसपास कोरोना […]
फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजिन्स अँड डेटा सायन्स या नवीन शाखेस मान्यता
सध्याच्या जमान्यात व बदलत्या काळानुसार उद्योग क्षेत्रातील पुणे, मुंबई, नागपुर, बेंगलोर व नवी दिल्ली इ. सारख्या शहरात विद्यार्थ्यांनी नवकल्पना आत्मसात केल्यास नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या अद्यावत क्षेत्राचा अभियांत्रिकीमध्येच समावेश करणे ही स्पर्धात्मक क्षेत्राची निकड ओळखून फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगोला येथे बी.टेक. डिग्रीसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजिन्स अँड डेटा सायन्स शाखेस अखिल भारतीय तंत्रक्षण परिषद , नवी दिल्ली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे यांनी या शैक्षणिक वर्षापासून६० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेस ग्रामीण भागात प्रथमतच मान्यता दिल्याची माहिती, संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर श्री. भाऊसाहेब रूपनर व प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे यांनी दिली आहे. एआय असलेल्या स्मार्ट मशीन मानवाप्रमाणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते. कृत्रिम बुध्दिमत्ता प्रणाली मशीन लर्निगचा वापर मशीनला डेटामधून स्वयंचलितपणे कार्य करण्याची परवानगी देते. डेटा सायन्स हे माहिती तंत्रज्ञान व अप्लाइड सायन्स यांचा एकत्रित परिणाम म्हणता येईल, ज्यामुळे उद्योगांच्या दृष्टीकोनातून डेटा छाननी करणे त्याचे प्रारूप ठरवणे, विश्लेषण करणे आणि तो सादर करणे सुलभ होते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स चा वापर दैनंदिन जीवनात:- उद्योग क्षेत्र:- रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमशीन सारख्या अत्यंत पुनरावृत्तीय कार्य विचारात घेऊन एआय प्रणाली वेगवान आणि सहजतेने कामगिरी करते व वेळ, ऊर्जा, श्रम यांची बचत होते. कृषी क्षेत्र:- एआय युक्त यंत्रे वनस्पतीच्या पानांमधील किरकोळ बदलही टिपून शेतकऱ्यांना पिकावर कोणता परिणाम होईल हे सांगू शकतात. शेतकऱ्यांनी कधी पेरणी करावी आणि कधी खत घालावे याची प्रक्रिया करणे डीप लर्निगच्या वापरामुळे मिळते. विमान वाहतूक:- जगभरातील विमानांची वाहतूक कॉम्प्युटरवर अवलंबून आहे. कोणते विमान कधी व कोणत्या मार्गाने जाईल हे माणूस ठरवू शकत नाही, हे सर्व यंत्रेच सांगतात.प्रवाशांचे साहित्य विमानातून बाहेर आणण्यापर्यंतचे सर्व निर्देष अशा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असलेल्या यंत्रांच्या सहाय्यानेच दिले जात असतात. आरोग्य क्षेत्र:- आरोग्य विभागात मशीन लर्निग ही प्रणाली रूग्णांच्या वेगवान, स्वस्त आणि अचूक निदान करण्यासाठी परिणामक ठरत आहे. एक्सरे, टेम्परेचर व ऑक्सिजन पाहून हे अँप सामान्य न्यूमोनिया आणि कोव्हिड-19 मधील फरक सांगते, महाराष्ट्र सरकारने याचा वापरही केला आहे. तसेच कोरोना काळात आंध्रप्रदेश आणि तेलंगणाच्या दुर्गम परिसरांमध्ये ड्रोनच्या सहाय्याने औषधे पोहोचवण्यात येत आहेत. या उदाहरणांमधून कृत्रिम बुध्दिमत्ता अँड विज्ञान हे कॉम्प्युटर सायन्सचे सर्वात आकर्षक व काळाची गरज आणि वेगाने वाढणारे क्षेत्र असल्याचे दिसेल. फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखा पूर्वीपासूनच आहेत. एआय अँड डेटा सायन्स ही अभियांत्रिकीची शाखा पुणे, मुंबई, औरंगाबाद व बारामती इ. शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मागील वर्षापासून सुरू आहे. परंतु आता या शाखेस सोलापूर जिल्हयामध्ये प्रथमतः फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून परवानगी मिळाली आहे. याशाखेचा अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रात आता सद्यस्थितीत व भविष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या शाखेच्या अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी या शाखेचे विभागप्रमुख प्रा. डॉ. तानाजी धायगुडे यांच्याशी संपर्क साधावा. (मो.नं. 9975497130, 9422321512) वेबसाईट –www.fabtecheducation.com











