Uncategorized

डॉक्टर पतीच्या प्रेमसंबंधास विरोध करणाऱ्या पत्नीस पंढरपुरात जीवे मारण्याची धमकी तर मुलीस मारहाण

एकफुल दो माली हा चित्रपट जुन्या जमान्यात प्रचंड गाजला होता पण वास्तव जीवनात दो फुल एक माली असेच चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळते.आणि यातून निर्माण झालेले वाद हे कधीकधी पोलीस ठाण्यात पोहोचतात.पंढरपूर शहरातही असाच एक प्रकार घडला असल्याचे दाखल गुन्ह्यावरून स्पष्ट होत असून एका डोळ्याच्या डॉक्टरचे एका महिलेशी प्रेम संबंध असून या प्रेमसंबंधास आक्षेप घेत असल्याने पंढरपुरात एका महिलेस भर दिवसा शिवीगाळ करण्यात आली तर सोबत असलेल्या त्या महिलेच्या मुलीस लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडल्याचे शहर पोलीस ठाण्यात फिर्यादीवरून दिसून येत आहे.
     
या प्रकरणी सदर तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून हे प्रकरण मिटणार कि आणखी चिघळणार हेच आता पहावे लागेल.          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *