Uncategorized

फॅबटेकच्या अमोल शिंदे या विद्यार्थ्यांची सेडिमॅक मेकॅट्रॉनिकक्स या नामांकित कंपनीमध्ये निवड

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या अमोल शिंदे या विद्यार्थ्यांची सेडिमॅक मेकॅट्रॉनिकक्स पुणे या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.
       सेडिमॅक मेकॅट्रॉनिकक्स हि कंपनी लहान पॉवर ट्रेन ,मोटर जेनेरेटर तयार करत असून भारतातील मेकॅट्रॉनिकस क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असल्याचे फॅबटेकचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. साहेबगौडा संगनगौडर यांनी सांगितले.
       फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालय या कोविड – परिस्थितीत विद्यार्थ्यांना अव्वल कंपन्यांमध्ये स्थान देण्यासाठी खूप प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि त्यांची कारकीर्द आमच्यासाठी अधिक मूल्यवान आहे. असे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर . मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी सांगितले.
    निवड झालेल्या या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे संचालक प्रा. अमित रूपनर, संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअररिंग विभाग प्रमुख प्रा. मल्लारेड्डी,ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडर सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *