Uncategorized

पंढरपूरकरांसाठी कोवॅक्सिन लसीचे ६०० डोस मिळणार

गेल्या काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यास कोविशील्ड लसीबरोबरच कॅव्हॅक्सिन लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होण्यास सुरुवात झाली असून १८  वर्षावरील वयोगटासाठी हि लस उपलब्ध करून देण्यात येत आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी शीतलकुमार जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक १० ऑगस्ट रोजी पंढरपूर शहर व तालुक्यासाठी कोवॅक्सिन लसीचे ६०० डोस उपलब्ध करण्यात येणार असून पंढरपुर शहर व करकंब आरोग्य केंद्र या ठिकाणी प्रत्येकी ३०० लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.     या लसीकरणासाठी ऑनस्पॉट लसीकरणाची सोय उपलब्ध नसल्याने हि लस घेण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी कोवीन ऍपच्या माध्यमातून लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे.नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना चार अंकी रेफरन्स कोड मिळणार असून तो रेफरंस कोड प्राप्त झालेल्या व्यक्तीसच लस घेता येणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.   

 पंढरपुर शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वेगानेव वाढत चालली असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळू लागले आहेत त्यामुळे लस घेण्याकडे नागिरकांचा कल वाढू लागला असतानाच वशिले बाजी आणि गावपुढाऱ्यांची दमदाटी होत असल्याच्या घटना घडत आहेत.पुळूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलीस पाटलाच्या पतीने वशिल्याच्या लसीकरणासाठी थेट आरोग्य कर्मचाऱ्यांनाच वेठीस धरल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता तर गेल्या जवळपास १० वर्षांपासून पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून ठाण मांडून असलेले डॉ.बोधले हे लस उपलब्धतेबाबत तसेच लसीकरणाचा दिवस आणि ठिकाणा बाबत वेळीच माध्यमांना माहिती देत नाहीत अशीही नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *