Uncategorized

शहीद पोलिस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने यांच्या जयंतीनिमित्त पुळूज येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

शहीद पोलिस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन पुळूज गावात करण्यात आले होते. यात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून एक आठवण व कोरोना काळात सामाजीक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न शहीद धनाजी व्हनमाने बहुउद्देशीय संस्था पुळूज च्या वतीने करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुळुज येथे आज या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी आपल्या मित्राची आठवण म्हणून शहीद धनाजी यांचे बॅचमेट एपीआय खरात साहेब, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत भागवत, पोलिस उपनिरीक्षक घुले, वलेकर साहेब, वगरे साहेब यांनी उपस्थिती दर्शवली. पुळूज पंचक्रोशीतील ५४ पेक्षा जास्त तरूणांनी यावेळी रक्तदान करून एक आगळी वेगळी मानवंदना दिली. व एक सामाजिक जबाबदारी पार पाडली. या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शहीद धनाजी व्हनमाने यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि त्यांच्या आठवणीने सर्व गाव गहिवरले. याचवेळी कै आमदार गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मानवंदना दिली. यावेळी वडील, तानाजी होनमाने, भाऊ, विकास होनमाने, रतिलाल गावडे, मोहन गावडे, मोहन खरात, सरपंच शिवाजी शेंडगे, स्मारक समितीचे अध्यक्ष ,लिंगदेव नीळगुंडे ,राजाराम बाबर, युवराज शिंदे, प्रमोद बाबर, माणिक बाबर, प्रभाकर शेंडगे, भारत पाटील, विश्वास पांढरे ,प्रकाश खरात, पैलवान महादेव शेंडगे, तुकाराम तेरवे, राजू माने,शिवाजी सलगर, केराप्पा मदने, प्रमोद गावडे, रविकांत खरात ,कामाजी वाघमोडे, सचिन कांबळे, उमेश होनकळस ,महेश वाघमोडे दत्तात्रय होनमाने व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे, शाळेतील शिक्षक सिद्धेश्वर भुई, विठ्ठलराव टाकले, सागर सोनावले, सचिन निरगीडे, विनोद राजमाने, मुख्याध्यापक तुकाराम गायकवाड, केंद्रप्रमुख ब्रम्हदेव घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान करणा-या प्रत्येक
व्यक्तीला संस्थेच्या वतीने एक रोप देऊन वृक्षारोपण व वृक्षसंगोपन करण्याचा संदेश देण्यात आला. या शिबिरासाठी इंडियन रेडक्राॅस सोसायटी संचलित गोपाबाई दमाणी ब्लड बॅंकेचे सहकार्य लाभले. येथील डाॅ अमरजा थेटे, पल्लवी डावरे, शैला करमळकर, ममता मेहता, सरस्वती माळी, तात्या पवार, महेश शिंदे, अनिल मारकड, देवीदास जाधव यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *