Uncategorized

शेगाव दुमाला येथे अवैध वाळू उपशावर विशेष पोलीस पथकाची कारवाई

     पंढरपूर तालुक्यातील पंढरपुर शहरा चंद्रभागागेच्या तीरावर असलेल्या शेगाव दुमाला परिसरात अवैध वाळू उपशावर आता पर्यत वारंवार कारवाया होऊन देखील या परिसरातून होणारा अवैध वाळू उपसा काही थांबत नसल्याची चर्चा सातत्याने होताना दिसून येते.सोमवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील विशेष पथकाने या ठिकाणी भल्या पहाटे दोन ट्रॅक्टर डंपीग ट्रेलरद्वारे अवैध वाळू उपसा करून वाहतूक करत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी कारवाई करून हे दोन्ही वाहने वाळूसह ताब्यात घेतली असून या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात या दोन्ही ट्रॅकटरच्या अज्ञात मालकासह  ट्रँक्टर या महेश चंद्रकांत आटकळे व निळ्या गणेश बंडु आटकळे रा. शेगाव दुमाला ता.पंढरपूर यांच्याविरोधात भा.दं.वि.कलम379,34सह गौण खनिज कायदा1978चेकलम4(1),4(क)(1)व21प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       या बाबत पो.कॉ.पंजाब सुर्वे यांनी दाखल केलेल्या फिर्यादी नुसार दि.16/08/2021 रोजी पोलीस उपविभागीय अधिकारीविक्रम कदम यांना मौजे शेगाव दुमाला ता पंढरपुर येथील भीमा नदीचे पात्रातुन वाळुचे अवैध्यरित्या उत्खनन करुन त्याची वाहतुक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.यावेळी त्यांनी या ठिकाणी जाऊन तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या.यानंतर मी व पो.हे.कॉ. कदम,पो.कॉ.हुलजंती व पो.कॉ.पंजाब सुर्वे हे खाजगी वाहनाने शेगाव दुमाला गावातील पाण्याचे टाकीजवळ येवुन थांबलो असता इस्कॉन मंदीरकडुन येणाऱ्या रोडने दोन ट्रँक्टर येत असल्याचे दिसले .यावेळी या पोलीस कर्मचाऱ्यांनी थांबविण्याचा इशारा केला असता, दोन्ही ट्रँक्टर थांबविण्यात आले सदर दोन्ही ट्रँक्टरची डंपिंग ट्राँलीची पहाणी केली असता त्यामध्ये वाळु असल्याचे दिसले. दोन्ही चालकाना वाळु परवाण्याबाबत विचारणा केली असता परवाना नसल्याचे सांगितले.सदर प्रकरणी 1) लाल रंगाचा स्वराज्य 855 लाल रंगाचे ट्रँक्टर कंपनिचा बिगर नंबरचा चेसी नं. 98D056000495 व बिगर नबरची लाल रंगाची डंपिंग ट्राँली 2) निळ्या रंगाचा सोनालिका ट्रँक्टर कंपनिचा त्याचा आरटिओ नं MH-13 AJ 0293 व बिगर नबरची लाल रंगाची डंपिंग ट्राँली असा 8 लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
     या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही ट्रॅक्टर व डम्पिंग ट्रेलरचे मालक कोण हे अजून निष्पन्न झाले नसल्याचे समजते.पंढरपूर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीसाठी अनेकवेळा बिगर नंबरच्या वाहनांचा वापर होत असल्याचे वेळावेळी करण्यात आलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.त्यामुळे अशा वाहनांच्या मालकाचा शोध घेणे हे मोठे आव्हान होऊन बसले आहे.अनेकवेळा अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून अथवा वाळू वाहतुकीच्या जास्तीत जास्त खेपा करण्याच्या नादात भरधाव आणि बेदरकारपणे वाहने चालवीत असल्याचे दिसून येते.आता शेगाव दुमाला येथील कारवाईत अवैध वाळू उपसा प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रॅक्टर मालकांचा शोध पोलीस नक्की घेतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *