Uncategorized

सोलापूर जिल्ह्यातील बड्या नेत्याशी संबंधित बँकेत कोटयवधीचा गैरव्यवहार

 सोलापूर जिल्ह्यात एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याशी संबंधित असलेल्या बँकेच्या  मुख्य शाखेसह अन्य पाच शाखांमध्ये मिळून २७ कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार झाल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी बँकेच्या सरव्यवस्थापकासह पाच शाखा व्यवस्थापकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याच वर्षी ३ एप्रिल २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत या बँकेच्या विविध शाखांच्या ५ व्यवस्थापकांनी […]

Uncategorized

नवाब मलिकांचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज

आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर फटाके फोडणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, फटाके फुटले नाहीत आवाज झाला नाही, असं नवाब मलिक म्हणाले.  यांचा बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबध असल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला गेला. देवेंद्र फडणवीस तुम्ही 1999 ला या शहरात आलात. यापूर्वी गोपीनाथ मुंडे नेते होते. त्यांनी देखील अशाचं प्रकारचे […]

Uncategorized

फॅबटेकच्या ३ विद्यार्थ्यांची टीसीएस या नामांकित कंपनी मध्ये निवड

येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या कॉम्प्युटर  इंजिनिअरिंग  विभागातील निशिगंधा संजय अदाटे व प्रतीक धम्मा मागाडे तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील तेजल रामचंद्र मिसाळ  या तीन  विद्यार्थ्यांची  टीसीएस  या नामांकित सॉफ्टवेअर कंपनी मध्ये निवड झाली असून त्यांना  वार्षिक ३.६  लाखाचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली. टीसीएस  हि अंतरराष्ट्रीय  आयटी कंपनी असून ती एक भारतातील दिगज्ज कंपनी आहे. भारतासह ४६ देशांमध्ये या कंपनीचा विस्तार आहे. या कंपनीमध्ये निवड झालेले  विद्यार्थी यांना कॉलेज कडून ओटू ब्रिथिंग  व क्यू स्पायडर  या ट्रेनिंग संस्थेमार्फत  ट्रेनिंग दिल्यामुळे,  विद्यार्थ्यांना कंपनीसाठी आवश्यक असणारे कौशल्य विकसित झाल्यामुळे  निवड प्रक्रिये मध्ये याचा फायदा होत असल्याची माहिती प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा  संगनगौडर यांनी दिली.      या निवड झालेल्या  विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग  डायरेक्टर मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी  अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री अमित रुपनर,  श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, कॉम्प्युटर  सायन्सचे  विभाग प्रमुख प्रा. पराग दौंडे,सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अभिमान कनसे, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा  संगनगौडर सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

Uncategorized

अक्षय देशपांडे यांची समाजसेवा गौरवास पात्र -आ.समाधान अवताडे

दिवाळी हा सण संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, दिवाळी आली असं म्हटलं की लहान मुले हे नेहमीच किल्ले बांधण्यासाठी अग्रेसर असतात.अशा लहान मुलांच्या कलांना वाव देण्यासाठी समाजसेवक अक्षय धनंजय देशपांडे मित्र परिवार यांच्या वतीने मागील दोन वर्षापासून किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सालाबाद प्रमाणे यावेळीही समाजसेवक अक्षय धनंजय देशपांडे […]

Uncategorized

यंदा कार्तिकी वारी भरणार

अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाची वाट संपुर्ण महाराष्ट्रातील वारकरी पाहात होते तो निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला असून आता सर्व वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी चालत कार्तिकी वारीला  जाण्याची परवानगी मिळाली आहे. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्तिकी वारी 15 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान या वारीला मोठी गर्दी अपेक्षित असल्यानं जिल्हा प्रशासनानंसह आपत्ती व्यवस्थापन तसेच सार्वजनिक […]

Uncategorized

बहुतांश पंच मेले असतील,वस्ताद उरले नसतील पण थोडेफार पैलवान उरलेत एवढे लक्षात घ्या ! 

शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून तालिमी,ओपन जिम,व्यायाम शाळा यांना लाखो रुपये अनुदान अथवा साहित्य स्वरूपात साहाय्य देण्यासाठी शासन स्तरावर विवीध निर्णय घेतले जातात.    पंढरपूर शहरात  १) बारभाई तालीम  २) थोरली तालीम  ३) कवडे तालीम  ४) डबल मडकी तालीम  ५) दाळे गल्ली तालीम ७) समर्थ रामदास तालीम  ८) कौलारू तालीम  ९) राघोजी भांगरे तालीम (सरकारी तालीम) […]

Uncategorized

बहुतांश पंच मेले असतील,वस्ताद उरले नसतील पण थोडेफार पैलवान उरलेत एवढे लक्षात घ्या !

शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून तालिमी,ओपन जिम,व्यायाम शाळा यांना लाखो रुपये अनुदान अथवा साहित्य स्वरूपात साहाय्य देण्यासाठी शासन स्तरावर विवीध निर्णय घेतले जातात.    पंढरपूर शहरात  १) बारभाई तालीम  २) थोरली तालीम  ३) कवडे तालीम  ४) डबल मडकी तालीम  ५) दाळे गल्ली तालीम ७) समर्थ रामदास तालीम  ८) कौलारू तालीम  ९) राघोजी भांगरे तालीम (सरकारी तालीम) १०) […]

Uncategorized

धाराशिव साखर कारखाना युनिट ४ सांगोला कारखान्याचे पोती पूजन संपन्न

अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला सांगोला येथील सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्याकडे आल्याने बारा वर्षांपासून बंद असलेला कारखाना अवघ्या महिन्याभरात सुरू करून आज साखर पोत्याचे पूजन करण्यात आले. त्यामुळे साखर कारखान्यास पुनर्जीवन मिळाले असून सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा भागातील हजारो तरूणाच्या हाताला काम मिळाले आहे. कारखाना सुरू झाल्याने शेतकऱ्यांत […]

Uncategorized

पंढपुरात कॉटन एक्स्पोच्या ठिकाणी खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

दिवाळीच्या सणानिमित्त सध्या पंढरपुरात खरेदीसाठी बाजार पेठांमध्ये ग्राहकाची मोठी वर्दळ दिसून येत आहे.मात्र याच संधीचा फायदा चोरटे उचलत असून सोमवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११चे सुमारास कोर्टी येथील एक कुटंब कपडे खरेदीसाठी स्टेशन रोड येथील कॉटन एक्स्पो च्या ठिकाणी आले असता गर्दीचा फायदा उचलत चोरट्याने महिलेच्या पिशवी मधील  06 ग्रँम वजनाची सोन्याची चैन (रिमझिम) व […]

Uncategorized

पंढरपूरात परिचारक नगर येथील राहते घरापासून मोटारसायकलची चोरी

पंढरपूर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी लावलेल्या दुचाकी चोरीचे प्रकार सातत्याने घडत असतानाच मागील काही दिवसापासून मध्यरात्रीच्या सुमारास थेट घरासमोरील हँड्ललॉक करून लावलेल्या मोटारसायकल ची चोरी होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.त्यामुळे शहरातील मोटार सायकल मालकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून वर्दळीच्या ठिकाणी मोटार सायकल पार्क करताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.गर्दीच्या ठिकाणी खरेदी अथवा इतर […]