

दिवाळीच्या सणानिमित्त सध्या पंढरपुरात खरेदीसाठी बाजार पेठांमध्ये ग्राहकाची मोठी वर्दळ दिसून येत आहे.मात्र याच संधीचा फायदा चोरटे उचलत असून सोमवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११चे सुमारास कोर्टी येथील एक कुटंब कपडे खरेदीसाठी स्टेशन रोड येथील कॉटन एक्स्पो च्या ठिकाणी आले असता गर्दीचा फायदा उचलत चोरट्याने महिलेच्या पिशवी मधील 06 ग्रँम वजनाची सोन्याची चैन (रिमझिम) व 1ग्रँम वजनाचे सोन्याचे बदाम असलेले पाकीट हातोहात लंपास केले आहे.या बाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सध्या स्टेशन रोडवरील कॉटन एक्स्पो या तयार कपडे विक्रीच्या ठिकाणी ग्राहकांची मोठी वर्दळ असून या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना वाहने लावण्यासाठी पार्किंगची सोय नाही,त्यामुळे या ठिकाणी सतत ट्रॅफिक जाम होत असल्याने गोधळाची परिस्थिती निर्माण होत आहे.अशा वेळी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे लक्ष विचलित करून चोरीच्या घटना घडू शकतात त्यामुळे या ठिकाणी शहर वाहतूक शाखेने कायम स्वरूपी वाहतूक कर्मचारी तैनात करणे गरजेचे झाले.