दिवाळी हा सण संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, दिवाळी आली असं म्हटलं की लहान मुले हे नेहमीच किल्ले बांधण्यासाठी अग्रेसर असतात.अशा लहान मुलांच्या कलांना वाव देण्यासाठी समाजसेवक अक्षय धनंजय देशपांडे मित्र परिवार यांच्या वतीने मागील दोन वर्षापासून किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सालाबाद प्रमाणे यावेळीही समाजसेवक अक्षय धनंजय देशपांडे मित्र परिवार यांच्यावतीने दिवाळी गड-किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान 100 मुलांच्यावर लहानग्यामुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता.
दीपावली निमित्त आयोजित गड-किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ काल संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार:समाधान दादा अवताडे आणि पंढरपूर मंगळवेढ्याचे युवक नेते प्रणवजी परिचारक आणि जेष्ठ पत्रकार अनिरुद्ध बडवे,यांनी हजेरी लावली होती,तसेच आमदार समाधान दादा अवताडे व जेष्ठ पत्रकार अनिरुद्ध बडवे यांचा सन्मान डॉ.धनंजय देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला.तर युवक नेते प्रणवजी परिचारक यांचा सन्मान समाजसेवक अक्षय देशपांडे यांनी केला,तसेच दीपावलीचे औचित्य साधून आयोजित गड-किल्ले स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या सर्व मान्यवरांचा गौरव करण्यात आला, स्पर्धकांनी खूप सुंदर किल्ले बनवले होते. ह्या किल्ला स्पर्धेत महिला सशक्तीकरण करण्यासाठी महिला गट बनवून बक्षीस दिले जाते.त्यास देखील मोठ्याप्रमाणात मुलींनी सहभाग घेतला नोंदविला होता.महिला गट,मोठा गट,लहान गट असे विभाग करण्यात आले होते.ह्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून चेतन देवडीकर,महेश काळे,प्रदीप बडवे,गणेश लंके,श्रीराम बडवे,प्रशांत सापणेकर यांनी परिक्षण केले.तर आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत विजय झालेल्या मुलांचा गौरव करण्यात आला.
आ.समाधान दादा अवताडे,ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध बडवे व युवक नेते प्रणवजी परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आमदार समाधान दादा अवताडे यांनी बोलताना म्हणाले की तसेच युवक नेते अक्षय देशपांडे हे नुसतेच युवकनेते नसून, ते समाजसेवक देखील आहेत समाजसेवा हीच ईश्वरसेवा असे म्हणत ते प्रभागात नेहमीच काम करत असतात,त्यांनी कोरोना काळात देखील स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे त्यांना कोरोना योद्धा म्हणून खूप ठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.त्यांच्या वडिलांप्रमाणेच त्यांनीदेखील समाजसेवा हीच ईश्वरसेवा असे म्हणत.प्रभागात असेच सामाजिक उपक्रम घेऊन,जनतेची सेवा करावी असे म्हणून असे मत व्यक्त केले.
यावेळी समाजसेवक अक्षय धनंजय देशपांडे मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
