सोलापूर जिल्ह्यात एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याशी संबंधित असलेल्या बँकेच्या मुख्य शाखेसह अन्य पाच शाखांमध्ये मिळून २७ कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार झाल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी बँकेच्या सरव्यवस्थापकासह पाच शाखा व्यवस्थापकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याच वर्षी ३ एप्रिल २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत या बँकेच्या विविध शाखांच्या ५ व्यवस्थापकांनी संगनमताने हा गैरव्यवहार केल्याची तक्रार बँकेचे वैधानिक लेखा परीक्षक गोकुळ राठी (रा. पर्वती, पुणे) यांनी दाखल केली असून सरव्यवस्थापका सह इतर ४ शाखा व्यवस्थापका विरोधात महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायद्यासह फसवणूक आदी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(या बाबत सविस्तर माहिती आम्ही लवकरच अपडेट करत आहोत)