Uncategorized

धाराशिव साखर कारखाना युनिट ४ सांगोला कारखान्याचे पोती पूजन संपन्न

अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला सांगोला येथील सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्याकडे आल्याने बारा वर्षांपासून बंद असलेला कारखाना अवघ्या महिन्याभरात सुरू करून आज साखर पोत्याचे पूजन करण्यात आले. त्यामुळे साखर कारखान्यास पुनर्जीवन मिळाले असून सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा भागातील हजारो तरूणाच्या हाताला काम मिळाले आहे. कारखाना सुरू झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाच वातावरण तयार झाले आहे.

यावेळी DVP उद्योग समूहाचे चेअरमन श्री.अभिजित पाटील म्हणाले की, कारखाना अनेक वर्षांपासून बंद असल्याने स्वतःच्या कारखान्यातील कामगार आणून कारखान्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून कारखानावर सुरू करण्यात यश आले आहे.

याप्रसंगी दिपकआबा साळुंखे-पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील, युवा नेते दिग्विजय पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे संचालक संतोष कांबळे, सुरेश सावंत, सजंय खरात, जयंत सलगर, व शहाजी नलवडे, तुकाराम जाधव, दिनकर चव्हाण, हणमंत पाटील, नंदकुमार बागल, सुरेश घाडगे, गणेश जाधव, अमित साळुंखे,अनिल यादव, रणजीत चव्हाण, मधूकर मोलाणे,पोपट घाडगे, गणेश लेंडवे, महेश जावळे, सजंय कारंडे, समाधान गाजरे, उमेश मोरे, योगेश होळकर, प्रकाश गाजरे, भागातील अनेक शेतकरी मंडळी, कामगार, अधिकारी वर्ग, तरूण सहकारी मित्र यांच्या उपस्थित पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *