

पंढरपूर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी लावलेल्या दुचाकी चोरीचे प्रकार सातत्याने घडत असतानाच मागील काही दिवसापासून मध्यरात्रीच्या सुमारास थेट घरासमोरील हँड्ललॉक करून लावलेल्या मोटारसायकल ची चोरी होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.त्यामुळे शहरातील मोटार सायकल मालकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून वर्दळीच्या ठिकाणी मोटार सायकल पार्क करताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.गर्दीच्या ठिकाणी खरेदी अथवा इतर कामानिमित्त मोटार सायकल घेऊन जाणाऱ्या नागिरकांनी शक्यतो आपल्या ओळखीच्या ठिकाणी दुचाकी लावून जाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.मात्र गेल्या काही दिवसात दुचाकी चोर थेट घरासमोरून हॅन्डल लॉक तोडून मोटार सायकल लंपास करू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
दिनांक 27/10/2021 रोजी रात्री अशीच घटना घडली असून पवन ज्ञानेश्र्वर देवकर,वय-25 वर्ष, व्यवसाय-सलुन दुकान, रा.प्रशांत परिचारक नगर पंढरपुर ता पंढरपुर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार बजाज कंपनीची पल्सर 220DTS-I-F काऴ्या रंगाची लाल पट्टया असलेली नं MH13CR 3506 ही हँण्डल लाँक करुन घरासमोर लावलेली दुचाकी २७ ऑक्टोबर च्या मध्यरात्री चोरटयाने चोरुन नेली आहे.