राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील हे सोमवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सोमवारी दुपारी १२ वाजता पंढरपुरातील संत तनपुरे महाराज मठ या ठिकाणी ते पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे विविध पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्याशी आढावा बैठकीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.अशी माहिती राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या […]
Uncategorized
पंढरपूर सिंहगड मध्ये कार्यशाळा उत्साहात संपन्न
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात रविवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी भाभा अँटोमिक रिसर्च सेंटर मुंबई व इंडियन असोसिएशनफॉर रेडिशन प्रोटेक्शन मुंबई यांच्या संयुक्त उपक्रमातुन विद्यार्थ्यांच्या मध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन अँड रिसर्च वृद्धिंगत होण्याच्या दृष्टिने “बेनिफिशयल इफेक्टस् ऑफ रेडिशन अँड इंडियन न्यूक्लिअर इनर्जी प्रोग्रॅम” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि […]
माघ वारीतही स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा प्रशासनाला मदतीचा हात
स्वेरी इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या माघ वारीत देखील पोलीस प्रशासनाला मदत करून जणू पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. विद्यार्थ्यांचे हे सामाजिक कार्य पाहून सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) तेजस्वी सातपुते यांनी प्रत्यक्ष येऊन स्वेरीच्या विद्यार्थ्यांची पाठ थोपटली आणि विशेष कौतुक केले. पंढरपूर मध्ये कोरोना कालावधीनंतर प्रथमच माघ वारी समाधानकारक भरली होती. मरगळ झटकून घालवून […]
फॅबटेकच्या दिपाली लेंडवे या विद्यार्थिनीची नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया या कंपनीमध्ये निवड
सांगोला: कॅम्पस प्लेसमेंट बाबतीत अग्रेसर असणाऱ्या फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभागातील दिपाली लेंडवे या विद्यार्थिनीची नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असून तिला वार्षिक 4.5 लाख रुपयाचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ रवींद्र शेंडगे यांनी दिली. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ही शेअर मार्केट डेरीवेटिव मधील […]
पुढे मित्र रात्रभर गाडी चालवत राहिले,मागील सिटरवर बसलेल्या मित्राचा घशात घास अडकल्याने मृत्यू
घशात अन्नाचा घास अडकल्याने एका व्यक्तीचा चारचाकी गाडीतील मागील सीटवरच मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली आहे. मात्र, साेबत असलेले दाेन मित्र याबाबत अनभिज्ञ हाेते. ते रात्रभर गाडीतच फिरत राहिले. पाेलिसांनी ही गाडी अडवून तपासणी केली.त्यानंतर ही घटना समाेर आली. सुनील उकरडे (४८) असे मृताचे नाव आहे. रामदास पेठचे ठाणेदार किशोर शेळके यांना दोन युवक सुभाष […]
देगाव येथील अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई
नियमबाह्य माती उपशाचीही मोठी चर्चा पंढरपूर तालुक्यातील देगाव हद्दतीतील स्मशानभूमी नजीकच्या भीमा नदीपात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा होत असून नदी लगतच्या परिसरात वाळूचा साठा केला जात असल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडेकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत या ठिकाणी कारवाई साठी धाव घेतली असता देगाव येथील स्मशानभुमी जवळून पायी चालत भिमानदीपात्राकडे जात असताना […]
फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राज्यस्तरीय इ-पोस्टर प्रदर्शन स्पर्धा उत्साहात संपन्न
सांगोला: येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राज्यस्तरीय इ-पोस्टर प्रदर्शन दिनांक ४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. या राज्यस्तरीय इ-पोस्टर प्रदर्शन स्पर्धेकरिता राज्यभरातून विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेचे फार्मसी पदवीकरिताचे विषय हर्बल इंडस्ट्री : प्रेझेंट स्टेटस अँड फिवचर प्रॉस्पेक्ट आणि फार्माकोव्हिजिलन्स होते. तर फार्मसी पदविका करिताचे विषय हे फार्मासिस्ट रोल इन कोविड स्विचवेशन आणि इफेक्टिव्हनेस ऑफ ऑनलाईन टिचिंग इन प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट होते. या स्पर्धेचे आयोजन संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर,मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अमित रुपनर,संचालक श्री. दिनेश रुपनर व कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने यशस्वी रित्या पार पडले. या राज्यस्तरीय इ-स्टर प्रदर्शन स्पर्धेकरिता पदविका शाखेमधून ७३ व पदवी शाखेमधून ११६ स्पर्धक सहभागी झाले होते. पदविका शाखेमधून प्रथम क्रमांक प्रगती विष्णू शेळके राजाराम बापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव इस्लामपूर, द्वितीय क्रमांक सुप्रिया आप्पासो काशीद फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी सांगोला तर पदवी शाखेतून प्रथम क्रमांक आकांशा बाळासाहेब शिंदे स्वेरी कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर, द्वितीय क्रमांक […]
पंढरपूर शहरातील लसीकरणास शासनाकडून सिरींज उपलब्ध होत नसल्याने ब्रेक
पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना संसर्ग सुरू असून पंढरपूर शहर कार्यक्षेत्रामध्ये व ग्रामीण भागामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक अभियाना अंतर्गत पंढरपूर शहर व तालुका कार्यक्षेत्रात 18 वर्षावरील नागरिकांसाठी Covishield व 15 ते 18 वर्षावरील लाभार्थ्यासाठी Covaxin लसीकरण करण्यात येत आहे..! या पंढरपूर शहरामध्ये शासनाकडून लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध […]
या तपासणी मुळे ऊस उत्पादकांचा कारखान्यावरील विश्वास अधिकाधिक वृद्धिंगत होण्यास मदतच -रोहन परिचारक
सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची तपासणी वैधमापन पथका कडून अचानकपणे केली जात आहे. आज मंगळवेढा तालुक्यातील युटोपियन शुगर्स च्या ६० टनी वजन काटयांची तपासणी वैधमापन विभागाकडून अचानकपणे करण्यात आली. युटोपियन शुगर्स चा वजन काटा हा तंतोतंत व बरोबर असल्याचा अहवाल दिला आहे. युटोपियन शुगर्स ने ऊस उत्पादक शेतकरी यांचा गेल्या […]
सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या 20 व्या पुण्य्तिथी निमित्त् कारखाना कार्यस्थळावर भजन कीर्तन संपन्न
सहकार शिरोमणी वसंतराव(दादा) काळे यांच्या 20 व्या पुण्य्तिथीनिमित्त् कारखाना कार्यस्थळावर कल्याणराव काळे बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेच्या माध्यमातुन कारखाना कार्यस्थळावर स्व्. दादांच्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन अध्यक्ष, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस बळीराम(काका) साठे व कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे व संचालक मंडळ यांनी पुष्पचक्र् वाहुन विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी ह.भ.प.मच्छिंद्र कावडे महाराज, सुपली यांनी श्रीविठ्ठल व […]











