Uncategorized

देगाव येथील अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई

नियमबाह्य माती उपशाचीही मोठी चर्चा 

पंढरपूर तालुक्यातील देगाव हद्दतीतील स्मशानभूमी नजीकच्या भीमा नदीपात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा होत असून नदी लगतच्या परिसरात वाळूचा साठा केला जात असल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडेकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत या ठिकाणी कारवाई साठी धाव घेतली असता देगाव येथील स्मशानभुमी जवळून पायी चालत भिमानदीपात्राकडे जात असताना एक लाल रंगाचा स्वराज्य कंपनीचा ट्रँक्टर त्याचे पाठीमागे बाजुस नदी पात्रातुन वाळु उपसा करणेकरिता वापरण्यात येणारी लोखंडी यारी लावलेली दिसली.व लगतच अंदाजे 20ब्रास वाळूचा ढिगारा दिसून आला तसेच लगतच एक लाल रंगाचा स्वराज्य कंपनीचा ट्रँक्टर त्याचे पाठीमागे बाजुस नदी पात्रातुन वाळु उपसा करणेकरिता वापरण्यात येणारी लोखंडी यारी लावलेली दिसली. व लगतच अंदाजे 10ब्रास वाळूचा ढिगारा दिसून आला.
सदर ठिकाणी मिळुन आलेल्या ट्रँक्टरचे व वाळुचे वर्णन खालीलप्रमाणे 1)5,00,000 /-रु त्यात एक लाल रंगाचा स्वराज्य कंपनीचा ट्रँक्टर, त्याचे पाठीमागे बाजुस नदी पात्रातुन वाळु उपसा करणेकरिता वापरण्यात येणारी लोखंडी यारी, ट्रँक्टरचे बाजुला साठा करुन ठेवलेली अंदाजे 20ब्रास वाळु ,एक लाल रंगाचा स्वराज्य कंपनीचा ट्रँक्टर त्याचा त्याचे पाठीमागे बाजुस नदी पात्रातुन वाळु उपसा करणेकरिता वापरण्यात येणारी लोखंडी यारी लावलेली असा मुद्देमाल जप्त केला आहे.
तर या कारवाईत या ठिकाणी आढळून आलेला वाळू साठा पोलिसांनी देगाव येथील तलाठी कोताळकर याच्या ताब्यात दिला आहे.देगाव परिसरातील नदी पात्रातून अशा प्रकारे थेट यांत्रिक यारीद्वारे इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात असताना तो महसूलच्या संबंधित तलाठी व मंडल अधिकारी यांच्या निदर्शनास कसा आला नाही याची चर्चा मात्र या तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कारवाई नंतर होऊ लागली आहे.
त्याच बरोबर देगाव येथील जिल्हा परिषद शाळा,हरिजन वस्ती,तलाठी कार्यालय परिसरातून रोज माती शेकडो टिपर माती वाहतूक होत असून हा माती उपसा होत असलेल्या परीसरात ग्रामदैवत संध्यावळी देवीचे मंदिर देखील आहे.अधिक माहिती घेतली असता सदर ठिकाणी माती उत्तखनन करण्यासाठी रॉयल्टी भरून परवानगी दिली गेल्याची चर्चा असली तरी रॉयल्टी किती ब्राससाठी भरलेली आहे आणि प्रत्यक्षात उत्तखनन किती करण्यात आले याचे मोजमाप इटिएस प्रणाली द्वारे होणार का ? व परवानगी पेक्षा अधिक माती उत्तखनन झाले असेल तर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तलाठी पुढाकार घेणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.मात्र याच वेळी सदर माती उत्तखनन होत असलेल्या ठिकाणी पडलेला प्रचंड मोठा खडडा हा देगावमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *