Uncategorized

पंढरपूर शहरातील लसीकरणास शासनाकडून सिरींज उपलब्ध होत नसल्याने ब्रेक

पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना संसर्ग सुरू असून पंढरपूर शहर कार्यक्षेत्रामध्ये व ग्रामीण भागामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक अभियाना अंतर्गत पंढरपूर शहर व तालुका कार्यक्षेत्रात 18 वर्षावरील नागरिकांसाठी Covishield व 15 ते 18 वर्षावरील लाभार्थ्यासाठी Covaxin लसीकरण करण्यात येत आहे..!
या पंढरपूर शहरामध्ये शासनाकडून लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे परंतु लसीकरण करण्यासाठी शासनाकडून सिरींज उपलब्ध होत नसल्याचे समजलेने लसीकरण करणे अशक्य झाले होते, जेव्हा आरोग्य अधिकारी यांनी ही बाब मांडली त्या वेळी नागरिकांच्या आरोग्यचा विचार करून व या मागणीचा पाठपुरावा तातडीने होणेसाठी श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून 25 हजार सिरींज आज आरोग्य विभागाकडे सुपूर्द केल्या व लसीकरण लवकरात लवकर सुरू करून लसीकरण वेगाने पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्नशील राहा असे सांगितले ..!
यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे, माजी सभापती दाजी पाटील, व्हा. चेअरमन कैलास खुळे सर, जि .प. सदस्य वसंत नाना देशमुख, संचालक दिलीप चव्हाण,भास्कर कसगावडे,सुदाम मोरे, ज्ञानेश्वर ढोबळे, दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी व आरोग्य विभागातील अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *