Uncategorized

पुढे मित्र रात्रभर गाडी चालवत राहिले,मागील सिटरवर बसलेल्या मित्राचा घशात घास अडकल्याने मृत्यू

घशात अन्नाचा घास अडकल्याने एका व्यक्तीचा चारचाकी गाडीतील मागील सीटवरच मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली आहे. मात्र, साेबत असलेले दाेन मित्र याबाबत अनभिज्ञ हाेते. ते रात्रभर गाडीतच फिरत राहिले. पाेलिसांनी ही गाडी अडवून तपासणी केली.त्यानंतर ही घटना समाेर आली. सुनील उकरडे (४८) असे मृताचे नाव आहे.

रामदास पेठचे ठाणेदार किशोर शेळके यांना दोन युवक सुभाष चौक परिरसात धिंगाणा घालत असल्याची माहिती रविवारी रात्री उशिरा मिळाली. त्यांनी पाेलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून दाेघांना ताब्यात घेतले. त्यानंतर चारचाकी वाहनाची तपासणी केली. गाडीच्या मागील सीटवर एक जण पडून असल्याचे िदसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो जागा झाला नाही. त्यामुळे त्याला सर्वाेपपचार रुग्णालयात भरती केले. मात्र, त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

तेल्हारा येथील जुने शहरातील सचिन संभाजी मोरे (३८), खार येथील रवींद्र बोदडे (४७) हे सुनील उकरडे यांच्यासोबत तेल्हाऱ्यावरून कामानिमित्त अकोल्यात येत होते. ते रेल्वे स्थानकजवळ पाेहाेचले. त्यांच्या वाहनाला एका दुचाकीस्वाराने कट मारल्याने त्यांनी दुचाकीस्वाराचा पाठलाग केला. या वेळी मागे बसलेल्या सुनील उकरडे यांचा सीटवरच मृत्यू झाल्याची बाब दोघांनाही माहिती नव्हती. सुभाष चाैकात परिसरात पाेहाेचल्यानंतर हा सर्व घटनाक्रम उजेडात आला. पोलिसांनी पंचनामा करून रात्रीच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात रवाना केला. शवविच्छेदन अहवालानुसार सुनील उकरडेंच्या घशात अन्नाचा घास अडकून त्यांचा श्वास गुदमरला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शवविच्छेदन अहवालात घास अडकल्याचे स्पष्ट
मृत सुनील उकरडे हे अकोल्यात बहिणीकडे जाण्यासाठी आले होते. ते ग्रामीण रुग्णालयात कार्यरत हाेते. प्रवासादरम्यान त्यांना उलट्याही झाल्या, असे त्यांच्यासोबत असलेल्या दोघांनी पोलिसांना सांगितले. मात्र, मृत्यू झाल्याचे या दोघांना माहीत नव्हते. पाेलिसांकडे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. दोन मित्रांनी पाेलिसांना दिलेल्या माहितीमध्ये आणि अहवालात साम्य आढळून आले उकरडेंच्या मृत्यूचे गूढ उकलले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *