Uncategorized

पंढरपूर सिंहगड मध्ये कार्यशाळा उत्साहात संपन्न

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात रविवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी भाभा अँटोमिक रिसर्च सेंटर मुंबई व इंडियन असोसिएशनफॉर रेडिशन प्रोटेक्शन मुंबई यांच्या संयुक्त उपक्रमातुन विद्यार्थ्यांच्या मध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन अँड रिसर्च वृद्धिंगत होण्याच्या दृष्टिने “बेनिफिशयल इफेक्टस् ऑफ रेडिशन अँड इंडियन न्यूक्लिअर इनर्जी प्रोग्रॅम” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्यात उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
     या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, मुंबई येथील डॉ. मुरली, श्रीमती रूपाली करपे, संजय पाटील, तेज मिना आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दिपप्रज्वलनाने कार्यशाळेची सुरवात करण्यात आली.
     महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून, सन्मान करण्यात आला. या कार्यशाळेत मान्यवरांनी विविध विषयांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखवले.
    हि कार्यशाळा सायन्स शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळा ही कोरोना संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन सोशल डिस्टनसिंग, मास्क व सॅनिटायझर वापर करून घेण्यात आली. पंढरपूर परिसरातील सायन्स शाखेत शिक्षण घेत असलेल्या १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. सहभागी विद्यार्थ्यांना भाभा अँटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) येथील पाच शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बापुसो सवासे यांनी केले तर आभार प्रदर्शन डाॅ. संपत देशमुख यांनी मानले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कार्यशाळा समन्वयक डाॅ. शिरीष कुलकर्णी सह महाविद्यालयातील
सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *