Uncategorized

माघ वारीतही स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा प्रशासनाला मदतीचा हात

 स्वेरी इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या माघ वारीत देखील पोलीस प्रशासनाला मदत करून जणू पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. विद्यार्थ्यांचे हे सामाजिक कार्य पाहून सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) तेजस्वी सातपुते यांनी प्रत्यक्ष येऊन स्वेरीच्या विद्यार्थ्यांची पाठ थोपटली आणि विशेष कौतुक केले.

        पंढरपूर मध्ये कोरोना कालावधीनंतर प्रथमच माघ वारी  समाधानकारक भरली होती. मरगळ झटकून घालवून शेतकरी व वारकरी पंढरी नगरीत पांडुरंगाच्या भेटीला आले होते. यावेळी  वारीच्या निमित्ताने पोलीस प्रशासनाने स्वेरी अभियांत्रिकीला मदतीची हाक दिली होती. स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी व फार्मसी या दोन्ही महाविद्यालयातील मिळून साधारण ३५ विद्यार्थी सलग पाच दिवस प्रशासनाला सहकार्य करत होते. चारही दिवस पंढरपूर मधील अंबाबाई पटांगण आणि शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या महत्वाच्या ठिकाणी उभारलेल्या पोलीस मदत केंद्रात दररोज तीन टप्यात हे विद्यार्थी वारकऱ्यांना मदत करत होते. विद्यार्थ्यांमधील मदत करण्याचा उत्साह पाहून पोलिसांवरील ताण काही प्रमाणात का होईना कमी झाला. स्वेरीच्या विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त सहभागामुळे पोलीस प्रशासनाला खूप मदत झाल्याची भावना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केली. स्वेरीने स्थापनेपासून शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील भरीव कामगिरी करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आषाढी वारी असो अथवा कार्तिकी वारी असो  पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांना मनापासून मदत करण्याचे काम स्वेरीचे विद्यार्थी करत असतात. यंदा देखील प्रशासनाच्या हाकेला प्रतिसाद देत संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकीचे राष्ट्रीय सेवायोजनेचे अधिकारी डॉ. महेश मठपती तसेच फार्मसीच्या राष्ट्रीय सेवायोजनेच्या अधिकारी प्रा. स्नेहल चाकोरकर यांच्या नेतृत्वाखाली अभियांत्रिकी व फार्मसीचे राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी सलग चार दिवस भाविकांना माहिती देण्याचे कार्य करत होते. यामध्ये शहरातील मठलॉजधर्मशाळारुग्णालयेभोजन व्यवस्थाशहराबाहेर जाणारे विविध रस्ते  याचबरोबरहरवलेली व्यक्ती अथवा चुकलेल्या व्यक्ती यांना उदघोषणेद्वारे नातेवाईकांच्या स्वाधीन करणेआदी वारी संबंधित महत्वपूर्ण कामे स्वेरीच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी केले. यामध्ये अक्षय मानेप्रशांत लांडगेसंतोष खिलारेसुनिल कारंडेशंकर नरळेगोरक्षनाथ शेजाळआदित्य काशीदउमेश मदनेमहेश देशमुखसुहास गाढवेओंकार बाबरतृप्ती सोनारसोनल निकमशेफाली गड्डमदीप्ती कदमतेजश्री डोंगरेकोमल धुमाळमोहिनी जमदाडेधनश्री मस्केज्ञानेश्वरी माळीसुप्रिया खेडकरअखिलेश कुटेअजिंक्य लोखंडेगणेश तोडकरअनिकेत बनसोडेआकाश सुडकेविशाल लिंगडे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम करून प्रशासनाला सहकार्य केले. यावेळी पोलीस प्रशासनातर्फे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधवउपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदमपंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण पवारनिर्भया पथकाचे प्रमुख पो.उ.नि. प्रशांत भागवत हे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी सौ. कुसुम क्षीरसागर, प्रसाद औटी, अरबाज खाटिक, अविनाश रोडगे, निलेश कांबळे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. त्यांनीही स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले. प्रशासनाला बहुमोल मदत केल्याबद्धल स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी स्वेरी कॅम्पसचे इन्चार्जविद्यार्थी अधिष्ठाता प्रा. करण पाटील व प्रा. यशपाल खेडकर यांनी समन्वयक म्हणून कार्य पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *