पंढरपूर उपविभागीय कार्यालयाच्या अधिनस्त विशेष पथकाने शिरढोण तालुका पंढरपूर येथील भीमा नदीच्या पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपशावर बुधवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत अशोक लेलँड कंपनीचे दोन पिकअप वाळूसह ताब्यात घेतले असून या प्रकरणी ६ जणांविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
Uncategorized
राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्यावरील खोटा गुन्हा त्वरित मागे घ्या
महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसचे अध्यक्ष महबूब शेख यांच्या विरोधात औरंगाबाद येथील एका महिलेने खोटा गुन्हा दाखल केला आहे.वास्तविक पाहता ज्या दिवशी गुन्हा घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे त्या दिवशी अध्यक्ष महबूब शेख हे मुबंईत होते हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे.सदर महिलेने दाखल केलेली फिर्याद हि खोटी असल्याचे […]
देवाचा नवस फेडण्यासाठीचे बोकड चोरटयांनी पळवले
बोकड आणले परत,गुन्हा दाखल पंढरपूर तालुक्यातील करोळे येथील शेतकरी बाजीराव मधुकर पाटील हे शेतीबरोबरच शेळीपालनाचा जोडव्यवसाय करतात.२८ डिसेंबरच्या मध्यरात्री बाजीराव पाटील हे झोपले असता त्यांना रात्री १ वाजनेच्या सुमारास चुलत भावाने गावात शेळीचोर आले आहेत असा फोन करून बाजीराव पाटील याना सावध केले असता बाजीराव पाटील यांनी शेळ्या बांधलेल्या […]
पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीक एका इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न
पंढरपूर शहरातील अतिशय वर्दळीचा समजला जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याभोवती बांधण्यात आलेल्या संरक्षक भीतीच्या आत प्रवेश करून एक इसम रात्री १०:४५ च्या दरम्यान दोरीच्या सहायाने आत्महत्येचा प्रयत्न करीत होता.मात्र या चौकात उपस्थित नामदेव जाधव व बंटी भोसले यांच्या नजरेस हि बाब पडली.त्यांच्यासह काही जणांनी तात्काळ या ठिकाणी […]
व्यंकटराव भालके पुन्हा मिशन मोडवर !
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार स्व.भारत भालके यांच्या निधनानंतर या दोन्ही तालुक्यातील स्व.भारतनाना प्रेमी जनतेमध्ये आणि विठ्ठल परिवारामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन हा तालुक्याचा आमदार झाला पाहिजे यासाठी या कारखान्याशी निगडित आणि पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात परिचारक विरोधी गट म्हणून समर्थकांना जवळपास तीस वर्षे प्रतीक्षा […]
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन अर्ज स्विकारणार
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र (अर्ज) दाखल करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरु आहे. काही ठिकाणी अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने व ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावल्याने ऑफलाईन पद्धतीने (पारंपरिक पद्धतीने) नामनिर्देशनपत्र (अर्ज) स्विकारण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहेत. इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये, त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून निवडणूक आयोगाने पारंपारिक […]
गाठ माझ्याशी आहे !
कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ३० लाखांचा निधी निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावाला देण्याची घोषणा करतानाच त्यांनी निवडणुकीत दडपशाही आणि दमबाजी करणाऱ्यांनाही दम भरला आहे. त्याचबरोबर असे प्रकार जर कोणी केले तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेवा, असा सज्जड दमच आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक […]
भारतात नव्या कोरोनाचा प्रवेश,ब्रिटनमधून परतलेले 6 जण पॉझिटिव्ह
वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक धक्कादायक बातमी समोर येते आहेत. भारतात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे (New Coronavirus Strain) 6 रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं या रुग्णांमध्ये सापडली आहेत. एकूण 6 जणांच्या सॅम्पलपैकी 3 बेंगळुरूतील NIMHANS मध्ये, 2 हैदराबादमधील CCMB मध्ये तर […]
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याने दाखवले धाडस
चोरीच्या उद्देशाने काळे,कपडे,कानटोपी,मफलर परिधान केलेले तीन चोरटे चोरीच्या उद्देशाने घरात घुसले असता चोरट्यांच्या हालचालीने सावध झालेल्या शेतकऱ्याने आरडाओरडा केला व चोरांना पकडण्यासाठी धाव घेतली.या पैकी एक चोरटा ठेस लागून पडल्याने या सदर शेतकऱ्याच्या हाती लागला असून त्याचे इतर दोन साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. […]
पंढरपूरातून ११ वर्षीय मुलाचे अज्ञातांकडून अपहरण ?
पंढरपूर शहरातील ज्ञानेश्वर नगर येथील राणी विष्णु चव्हाण वय- 25वर्षे,व्यवसाय- मजुरी ,रा- ज्ञानेश्वरनगर,पंढरपुर यांनी मुलगा रवि विष्णु चव्हाण वय-11 वर्षे यास अज्ञात कारणावरून अज्ञात इसमांनी पळवून नेल्याची फिर्याद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली असून या घटनेमुळे या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बाबत सदर महिलेने […]











