Uncategorized

पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीक एका इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न

          पंढरपूर शहरातील अतिशय वर्दळीचा समजला जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याभोवती बांधण्यात आलेल्या संरक्षक भीतीच्या आत प्रवेश करून एक इसम रात्री १०:४५ च्या दरम्यान दोरीच्या सहायाने आत्महत्येचा प्रयत्न करीत होता.मात्र या चौकात उपस्थित नामदेव जाधव व बंटी भोसले यांच्या नजरेस हि बाब पडली.त्यांच्यासह काही जणांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेत त्या व्यक्तीच्या गळ्यातील गळफास सोडवला.त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
         या बाबत नामदेव दत्तात्रय जाधव वय-22 धंदा-मजुरी ,जात -मराठा रा.गजानन महाराज मठाचे मागे,संतपेठ पंढरपुर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सदर गळफास घेऊन आत्महत्या करू पाहणाऱ्या इसमास पकडून पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे आणले असता त्याने आपले नाव पिनु बबन गिरी गोसावी रा. शिखर शिंगणापुर ता.म्हसवड जिल्हा सातारा हल्ली मंदिराजळ वाखरी,ता-पंढरपुर असे असल्याचे सांगितले आहे.
         छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या संरक्षक भिंतीच्या आत प्रवेश करता येण्यासाठी जे प्रवेशद्वार ठेवले आहे ते नियमितपणे सायंकाळच्या कुलूपबंद केले गेले पाहिजे आणि या ठिकाणी cctv बसविले गेले पाहिजेत अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *