Uncategorized

पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याने दाखवले धाडस 

            चोरीच्या उद्देशाने काळे,कपडे,कानटोपी,मफलर परिधान केलेले तीन चोरटे चोरीच्या उद्देशाने घरात घुसले असता चोरट्यांच्या हालचालीने सावध झालेल्या शेतकऱ्याने आरडाओरडा केला व चोरांना पकडण्यासाठी धाव घेतली.या पैकी एक चोरटा ठेस लागून पडल्याने या सदर शेतकऱ्याच्या हाती लागला असून त्याचे इतर दोन साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.
           या बाबत दाखल फिर्यादीनुसार सविस्तर वृत्त असे कि,पंढरपूर तालुक्यातील आंबेचिंचोली येथील शेतकरी महादेव शिवदास मदने वय. 36 वर्षे, धंदा. शेती हे रात्री ९ वाजलेच्या सुमारास जेवण करून घरात टीव्ही पहात बसले होते.तर फिर्यादीचे वडील शिवदास हे दुसऱ्या खोलीत झोपले होते.सदर फिर्यादी महादेव मदने हे लघुशंकेसाठी बाहेर आले असता त्यांना त्यांच्या वडिलाच्या खोलीत काळे कपडे घातलेले, तोंडाला मफलर सारखा कापड बांधलेले, डोक्याला काळया रंगाचे उलन टोपी घातलेले तिन इसम खोलीतील सामान चाचपत असलेले दिसले.यावेळी सदर शेतकऱ्याने आरडाओरडा केला असता त्यांचा भाऊ हा देखील जागी झाला.आरडाओरडा ऐकताच चोरटयांनी तिथून पळ काढला यावेळी फिर्यादी व त्याचा भाऊ यांनी सदर चोरट्यांचा पाठलाग केला.या पैकी एक चोरटा त्यांच्या हाती लागला.पकडलेल्या इसमास धरून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता तो त्याचे नाव पत्ता सांगणेस टाळाटाळ करत होता. म्हणुन पुळुज ते आंबेचिंचोलीकडे जाणा-या रोडवर आणले. व तेथे बजाज डिस्कव्हर कंपनीची एक मोटार सायकल उभी होती. त्या मोटार सायकलच्या नंबर प्लेटवर एम एच – 45 – पी – 6210 असे नंबर होती. पकडलेल्या इसमास ही मोटार सायकल कोणाची आहे. असे विचारले असता त्याने त्याचीच असल्याचे सांगितले.यावेळी चाललेला गोंधळ ऐकून आजूबाजूचे अनेक शेतकरी जमा झाले. यावेळी जमावाने मारहाण केल्याने संशियत इसम जबर जखमी झाला असून त्यास पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे दाखल केले आहे.
            या प्रकरणी महादेव शिवदास मदने वय. 36 वर्षे, धंदा. शेती, रा. आंबेचिंचोली, ता. पंढरपूर यांनी पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात वरील आशयाची फिर्याद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *