पौराणिक, धार्मिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्यांनी नटलेले हे गाव पर्यटनासाठी उत्तम पर्याय आहे. हे गाव क्रांतिकारकांची, स्वातंत्र्य-सैनिकांची, कलावंतांची पैलावानांची भूमी म्हणून ओळखले जाते. इथले हेमाडपंथी खंडोबा मंदिर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. माणगंगा नदी व निसर्गाच्या कुशीत वसलेले नदी पात्रातील प्राचीन बिंडप्पा बेट, प्राचीन महादेव मंदीर व केदारलिंग मठ, बिरोबा मंदिर, लाडले मशाक दर्गाह, वेताळ देव, […]
Uncategorized
पंढरपूर तालुक्यात तोतया पोलीस करत होता दंड वसुली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यानंतर जागो जागी विनामास्क तर कधी डबलसीट असलेल्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्यासाठी थांबलेले पोलीस कर्मचारी हे दृश्य नित्याचे झाले होते.शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील हेच दृश्य नित्याचे झाले असल्याने या बाबत कुणाला शंका येण्याचीही कारण नव्हते. मात्र याचाही गैरफायदा उठवत रस्त्यावरून ये -जा करणाऱ्या दुचाकी चालकांना अडवून […]
वाळूचा टिपर सोडून देण्यासाठी ५० हजाराची मागणी
राज्यात अवैध वाळू चोरांनी उच्छाद मांडला असून अनेक ठिकाणी राजकीय पाठबळ तर अनेक ठिकाणी पोलिसांच्या हफ्तेखोरीमुळे अवैध वाळू उपसा करणारे वाळू माफिया राजरोसपणे वाळू उपसा करताना दिसतात.चुकून माकून कारवाई झालीच तर पोलीस ठाण्यातून वाहन कसे सोडवायचे याचे सारे तंत्रही त्यांना अवगत झाले आहे अशीही चर्चा होताना दिसून येते.तर बऱ्याच वेळा वाळू वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी कारवाई […]
पंढरपूर अर्बन बँकेचा समर्पण पुरस्काराने गौरव
कोरोना काळात देखील ग्राहकांना अखंड सेवा देत ग्रामीण भागात सर्वसामान्य जनतेपर्यंत आर्थिक मदतीचा हात दिल्याबद्दल पुणे येथील ग्रीनवर्ल्ड पब्लिकेशनच्या वतीने विविध सहकारी बँकांचा सन्मान केला असून त्यावेळी आपले पंढरपूर अर्बन को.ऑप. बँकेस समर्पण पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणे येथील कॉसमॉस बँकेच्या सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला. निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, सहकार आयुक्त अनिल कवडे […]
फॅबटेकचा विद्यार्थी प्रताप कचरे याची व्हेरॉक लाइटिंग सिस्टिम इंडिया प्रा. लि. या नामांकित कंपनी मध्ये निवड
फॅबटेकच्या प्रताप कचरे या विद्यार्थ्यांची व्हेरॉक लाइटिंग सिस्टिम इंडिया प्रा. लि. या नामांकित कंपनी मध्ये निवड सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रताप कचरे या विद्यार्थ्यांची ट्रान्सफॉर्म को या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली. व्हेरॉक हि मल्टी […]
सहकार शिरोमणी साखर कारखान्यास राज्य शासन देणार १८ कोटीची थकहमी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्जास सरकारची थकहमी देण्यासह 11 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. गाळप हंगामाकरिता साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्जास शासनाची थकहमी देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. गाळप हंगाम 2021-22 करीता राज्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांच्या 28 कोटी रुपये इतक्या अल्पमुदत कर्जास शासन थकहमी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ […]
करकंब पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश तारू यांचा महर्षी वाल्मिकी संघटनेकडून सत्कार
पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या करकंब पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश तारू यांनी या ठाण्यांतर्गत येत असलेल्या कार्यक्षेत्रातील गावात अवैध व्यवसायिक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा वचक बसवला आहे.जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या आदेशाने आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हातभट्टी व रसायन मिश्रित दारू विक्रीवर अनेक कारवाया […]
मराठा सेवा संघाने समाज परिवर्तनाचे काम केले – आ.समाधान आवताडे
अॅड.पुरूषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा सेवा संघाने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांच्या विचारानुसार नोकरदार वर्गाला एकत्र करत समाज परिवर्तनाचे काम केल्याचे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर तालुका मराठा सेवा संघाच्या कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रमात केले. मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पंढरपूर तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने कोरोना […]
फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये आरोग्याचे महत्व आणि संतुलित आहार मार्गदर्शन संपन्न
सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि संतुलित आहार या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित केले होते. अन्न ही मानवी जीवनाचे अस्तित्व टिकवण्यास आवश्यक अशी प्राथमिक गरज आहे. शरीराची वाढ होणे, झीज भरून काढणे, ऊर्जा निर्मिती,कार्यशक्ती हे अन्नामुळे घडून येते. त्यामुळे आहारामध्ये संतुलित आहार व पोषण […]
शेतकऱ्यांच्या हितासाठी समृद्धी ट्रॅक्टर सदैव सोबत असेल:- चेअरमन अभिजीत पाटील
सांगोला तालुक्यात समृद्धी ट्रॅक्टर्सचा नूतनीकरण समारंभ सांगोल्याचे आमदार श्री.शहाजीबापू पाटील, मा.आमदार श्री.दीपक आबा साळुंखे-पाटील, युवा नेते श्री.बाबासाहेब देशमुख, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील, मा. आमदार दिपक आबा साळुंखे-पाटील, जि.प.सदस्य अतुल पवार या प्रमुख मान्यवरांनी याप्रसंगी शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून […]











