

पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या करकंब पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश तारू यांनी या ठाण्यांतर्गत येत असलेल्या कार्यक्षेत्रातील गावात अवैध व्यवसायिक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा वचक बसवला आहे.जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या आदेशाने आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हातभट्टी व रसायन मिश्रित दारू विक्रीवर अनेक कारवाया करत परिवर्तन मोहिमे यशस्वीपणे राबिवली आहे.पोलीस निरीक्षक निलेश तारू यांच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल आज महर्षी वाल्मीकी संघाच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे दादासाहेब करकमकर ,भारत कोळी, गोपाळ तारापूरकर,ऑड. राहूल तपकिरे, अतुल अभंगराव,सूरज वाघमारे,लक्ष्मण शिंदे आदी उपस्थित होते.