

पौराणिक, धार्मिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्यांनी नटलेले हे गाव पर्यटनासाठी उत्तम पर्याय आहे. हे गाव क्रांतिकारकांची, स्वातंत्र्य-सैनिकांची, कलावंतांची पैलावानांची भूमी म्हणून ओळखले जाते. इथले हेमाडपंथी खंडोबा मंदिर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. माणगंगा नदी व निसर्गाच्या कुशीत वसलेले नदी पात्रातील प्राचीन बिंडप्पा बेट, प्राचीन महादेव मंदीर व केदारलिंग मठ, बिरोबा मंदिर, लाडले मशाक दर्गाह, वेताळ देव, दत्त मंदीर,अंबिका माता मंदीर व अशी अनेक स्थाने या जागेला एक मांगल्य प्रदान करतात. इतिहासातील १६ व्या शतकाचे म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील संदर्भ देणाऱ्या बिंडप्पा बेटाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचल्यास येथे पर्यटकांचा ओघ वाढेल हे निश्चित.
या स्थानाला प्रसिद्धी मिळावी व ही माहिती व जगभरातील लोकांना उपलब्ध व्हावी यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन व immortal IT सोल्युशन कंपनीच्या सहकार्याने QR कोडचे उद्घाटन आजच्या भेटीदरम्यान करण्यात आले. हा कोड आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये स्कॅन केल्यास या ठिकाणची सर्व माहिती, फोटो, विडिओ पर्यटकांना पाहता येणार असून त्यामुळे आपोआप येथे भविष्यात पर्यटन वाढेल ही आशा या कंपनीचे प्रा. सारंग तारे यांनी व्यक्त केली.
यावेळी बिंडप्पा बेट हे पर्यटन स्थळ पाहण्यासाठी इतर परिसरातील ही पर्यटक उपस्थित होते.