सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि संतुलित आहार या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित केले होते. अन्न ही मानवी जीवनाचे अस्तित्व टिकवण्यास आवश्यक अशी प्राथमिक गरज आहे. शरीराची वाढ होणे, झीज भरून काढणे, ऊर्जा निर्मिती,कार्यशक्ती हे अन्नामुळे घडून येते. त्यामुळे आहारामध्ये संतुलित आहार व पोषण दृष्ट्या समतोल हवा. या कार्यक्रमासाठी पहिली ते चौथी या गटासाठी डॉक्टर अस्मा तांबोळी व चौथी ते नववी गटासाठी डॉक्टर झीनत तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व सांगून संतुलित आहार कसा घ्यावा व बेकरीचे पदार्थ, फास्ट फूड हे कसे टाळावे याबद्दल सांगितले. हा कार्यक्रम संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदरहनाखाली व प्राचार्य सिकंदर पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल लिगाडे व सतीश देवमारे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप समाधान खांडेकर व निसार इनामदार यांनी केला. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी व पालक वृंद ऑनलाइन उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
