Uncategorized

राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी निवडी जाहीर

राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी निवडी जाहीर पंढरपूर मध्ये जिल्हा आढावा बैठक आयोजित करून केल्या निवडी सोलापूर जिल्हा प्रभारी रणजीत दादा सुळ व जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप दादा गडादे यांच्या हस्ते पाधादिधिकरी यांना दिली नियुक्ती पत्रे पंढरपूर तालुक्यातील निवडी खालील प्रमाणे तालुका अध्यक्ष संजय लवटे सर जिल्हा उपाध्यक्ष पदी शरदचंद्र पांढरे जिल्हा सरचिटणीस नवनाथ मदने तालुका […]

Uncategorized

कोरोना कालखंडानंतर पीजी-डीएमएलटी कोर्सचे वाढते महत्व व करिअरच्या संधी

समाज जिवनामध्ये सर्वसामान्य लोकांना आपल्या आरोग्यासंबंधी काही गोष्टी माहित असाव्यात आणि आजाराचे योग्य निदान करण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब्रॉटरीची निवड करण्या इतपत त्यांना माहिती करणे हा यामागचा उद्देश आहे. वैद्यकीय ज्ञानाचा मार्ग हा पॅथॉलॉजी संग्रहालयातून जातो औषध विक्रेत्याच्या दुकानातून नाही हे प्रामुख्याने आपण  समजून घेतले पाहिजे.    या जगात रुग्णालये ही वैज्ञानिक (शास्त्रोक्त ) वैद्यकशास्त्राचे फक्त प्रवेशद्वार आहे. प्रथम निरीक्षण  क्षेत्र आहे, ज्यामध्ये डॉक्टर येतात पण वैद्यकीय शास्त्राचे खरे आश्रयस्थान आहे ते लॅब्रॉटरीज, फक्त तिथेच प्रायोगिक विश्लेषणाची साधने वापरून सामान्य आणि पॅथॉलॉजीकल अवस्थांमधील आयुष्याचा शोध घेतला जातो. पीजी डीएमएलटी कोर्समध्ये तुम्हाला लॅब टेस्टिंग बद्दल  वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. लॅबमध्ये टेस्ट करून लॅब टेक्निशियन डॉक्टरला आजाराचे निवारण करण्यास मदत करतो.     पीजी डीएमएलटी कोर्समध्ये तुम्हाला  शरीररचना, शरीरशास्त्र,  सूक्ष्मजीवशास्त्र, जीवनशास्त्र, रक्तवाहिन्यासंबंधी विषय शिकवले जातात. शरीरशास्त्रात  तुम्हाला हाडे आणि शरीराच्या अवयवांबद्दल शिकवले जाते. शरीरविज्ञान मध्ये आपल्याला विविध महत्वाच्या अवयवांबद्दल शिकवले जाते. सूक्ष्मजीवशास्त्र  मायक्रोबायोलॉजीमध्ये आपल्याला बॅक्टिओलॉजी, विषाणूशास्त्र, परजीवी विज्ञान, बुरशीचे आणि डाग-डागांबद्दल शिकवले जाते. जीवशास्त्रात तुम्हाला अजैविक रसायनशास्त्र, द्रावण तयार करणे, सेंद्रिय रसायनशास्त्र, जैवरासायनिक नमुना संग्रह, प्लाझ्माचे पृथक्करण, मूत्र आणि मलची रासायनिक तपासणी याबद्दल शिकवले जाते. पॅथॉलॉजीमध्ये आपल्याला नमुने गोळा करणे, एचबी, आरबीसी गणना, लेबलिंग, अहवाल देणे आणि अहवाल पाठविणे शिकविले जाते.          यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल कि, पीजी डीएमएलटी कोर्समध्ये तुम्हाला काय शिकवले जाईल. लक्षात राहू द्या कि, हा फक्त अभ्यासक्रमाचा सारांश आहे, तुम्हाला पीजी डीएमएलटी  कोर्समध्ये याबद्दल भरपूर काही शिकवले जाईल.  पीजी डीएमएलटी कोर्स पूर्ण झाला म्हणजे तुम्ही लॅब टेक्निशीन म्हणून काम करण्यासाठी पात्र होतात. कोर्स झाल्यावर तुम्ही नोकरी करू शकता.  तुम्हाला लॅब टेक्नॉलॉजिस्ट, लॅब टेक्निशिअन, किंवा लॅब वर्कर म्हणून नोकरी भेटेल. तसेच तुम्ही सरकारी किंवा खाजगी दवाखान्यामध्ये नोकरी करू शकता. नर्सिंग होम मध्ये लॅब टेक्निशियन म्हणून नोकरी करू शकता. फार्मा कंपनी किंवा मेडिकल कंपनीच्या वेगवेगळ्या लॅबमध्ये काम करू शकता. तुम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये देखील काम भेटते. हा कोर्स १.५  वर्षाचा असून त्यात २  सेमिस्टर्स असतात. या सेमिस्टर नंतर ६  महिन्याची इंटर्नशिप सरकार मान्य पॅथॉलॉजी लॅबमध्ये करावी लागते.     भारतासारख्या विशाल लोकसंख्या असलेल्या देशात रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा देण्यासाठी चांगल्या प्रशिक्षित डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, पॅथॉलॉजिस्ट या सर्व घटकांची खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत आहे. सध्याच्या कोरोना विषाणूच्या प्राश्वभूमीवर अवघे जग चिंताग्रस्त असून रुग्णांना अतिजलत सर्व ते उपचार मिळणे आवश्यक आहेत. याबरोबरच वैद्यकीय मनुष्यबळ यामध्ये सर्व प्रकारच्या कोरोना योध्याची आवश्यकता भासत आहे.         या सर्व बाबींची आवश्यकता पाहता फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी आपल्या कॅम्पसमध्ये  पीजी डीएमएलटी   हा  कोर्से केला  असून  याला शासनाची  मंजुरी मिळाली आहे.  हा लेख लिहण्यामागे हा हेतू आहे कि, सध्या बी. एससी. पास आऊट विद्यार्थी मोठ्या संख्येने बेरोजगार आहेत. यातील काही विद्यार्थी हा कोर्से पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी करू शकतात किंवा आपली स्वतःची लॅब टाकू शकतात . या कोर्सकरिता पात्रता हि बी.एस्सी पदवी असावी लागते. यामध्ये बॉटनी, मायक्रोबियॉलॉजि, झूलॉजि, केमिस्ट्री, बायोलॉजि, बायोटेक्नॉलॉजि यापैकी कोणत्याही एका  विषयाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फक्त मॅथ्स व फिजिक्स हे विषय सोडून इतर सर्व विद्यार्थी या कोर्सकरिता पात्र ठरतात.फॅबटेक  महाविद्यालयांमध्ये सुसज्य लॅब्स,  क्लासरूम्स,  लायब्ररी, अनुभवी प्राध्यापक वर्ग या सर्व बाबींचा विचार करता  विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा .                                                                                                                                लेखक: डॉ.संजय बैस ( प्राचार्य )                                                                                     […]

Uncategorized

सिंहगडच्या चार विद्यार्थ्यांची “ऑटोस ग्लोबल आयटी सोल्युशन्स” कंपनीत निवड

औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन अपेक्षित शैक्षणिक सुविधा व नवीन मुल्यवर्धित कार्यशाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व औद्योगिक तंत्रज्ञानाशी अनुसरून विकास झाल्यामुळे तसेच महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंट यांचा स्वतंत्र विभाग असल्यामुळे पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आज मोठ्या प्रमाणावर नामांकित कंपनीत निवडला जात आहे. चालू शैक्षणिक वर्षांतील चार विद्यार्थ्यांची “ऑटोस ग्लोबल आयटी सोल्युशन्स” कंपनीत […]

Uncategorized

सहकार आयुक्त अनिल कवडे यांची पंढरपूर अर्बन बँकेला वर्धापनदिनानिमित्त सदिच्छा भेट

सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून प्रसिध्द असलेल्या दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूरला महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक (भा.प्र.से.) मा.श्री.अनिलजी कवडेसाहेब यांनी भेट देवून 109 व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देवून बँकेचे कामकाजाबाबत समाधान व्यक्त करीत काही महत्वपूर्ण सूचना दिल्या. यावेळी त्यांचा तुळशीहार घालून सत्कार बँकेचे चेअरमन आ.प्रशांत परिचारक यांनी केला. भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये असणारे श्री.अनिलजी कवडे साहेब, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य […]

Uncategorized

फॅबटेक ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे सीईटी व नीट परीक्षेमध्ये उज्वल यश

 फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी सीईटी व नीट परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे. मेडिकल अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी नीट परीक्षा चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण होणे आवश्यक असते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी  अखंड परिश्रम आणि मेहनतीची गरज असते. वेळेचे नियोजन  आणि आत्मविश्वास यावरच विद्यार्थी नीट परीक्षा यशस्वी पास होऊ […]

Uncategorized

कर्मवीर औदूंबर(आण्णा) पाटील यांच्या ९८ व्या जयंती निमित्त मंगळवारी मोफत कॅन्सर,मेंदू विकार,नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन

माजी आमदार,श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.औदुंबर आण्णा पाटील यांच्या ९८ व्या जयंती निमित्त मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी येथील कर्मवीर औदूंबररावजी पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या संचलित विठ्ठल हॉस्पिटलच्या वतीने कॅन्सर रोग,मेंदू विकार व नेत्रतपासणी शिबिराचे आयॊजन करण्यात आले आहे.                या शिबीराचे उदघाटन रावसाहेब पाटील (चेअरमन वि.का.सोसायटी […]

Uncategorized

एसटी कामगारांनो पटणार नाही पण लिहतोय !

१९८२ चा गिरणी कामगारांचा संप चुकीचा नव्हता आणि मागण्याही रास्त होत्या.मुंबईच काय साऱ्या महाराष्ट्रातील जनतेला गिरणी कामगारांच्या वेदना पहावत नव्हत्या.पण पुढे राजकारण शिरले आणि धनाड्य गिरणी मालक तर वाटच पहात होते या संधीची. एसटी कामगारांवर अन्याय होतोय हे त्रिवार सत्य आहे पण कोरोनाच्या आर्थिक संकटातून आता कुठे आपण बाहेर पडलो आहोत.आपण १४ दिवस केलेला संप […]

Uncategorized

पंढरपूरातून पोलीस भरती परीक्षेसाठी साठी निघालेले दोघे तरुण कारच्या धडकेत जबर जखमी

 सोलापूर येथे पोलीस भरतीसाठीच्या लेखी परीक्षेस दुचाकीवर निघालेल्या दोन तरुणास भैरवनाथ वाडी तालुका पंढरपुर नजीक समोरून रॉंग साईडने आलेल्या मारुती इको कार चालकाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात हे परीक्षार्थी तरुण जबर जखमी झाले आहेत.या बाबत  कृष्णा बाळासाहेब माने याने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून ती पुढील प्रमाणे आहे.    या बाबत दाखल झालेली […]

Uncategorized

फॅबटेकची विद्यार्थिनी सिमरन खतीबची कॅपजेमिनी या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये निवड

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्म्युनिकेशन    विभागातील सिमरन खतीब या विद्यार्थिनीची  कॅपजेमिनी या मल्टि नॅशनल कंपनी मध्ये  निवड झाली असून  ३.८ लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले असल्याची  माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली. कॅपजेमिनी  हि आयटी सेक्टर मधील मल्टिनॅशनल कंपनी असून तिचे हेड ऑफिस […]

Uncategorized

आ.समाधान आवताडे यांनी घेतली उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांची भेट घेऊन पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याचा औद्योगिक दृष्टया विकास होण्यासाठी अपेक्षित असलेल्या उपाय योजना आणि निर्णय या बाबत चर्चा करून विविध मागण्यांसाठीचे पत्र ना. देसाई यांना दिले आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्याचे बहुतांश अर्थकारण हे […]