समाज जिवनामध्ये सर्वसामान्य लोकांना आपल्या आरोग्यासंबंधी काही गोष्टी माहित असाव्यात आणि आजाराचे योग्य निदान करण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब्रॉटरीची निवड करण्या इतपत त्यांना माहिती करणे हा यामागचा उद्देश आहे. वैद्यकीय ज्ञानाचा मार्ग हा पॅथॉलॉजी संग्रहालयातून जातो औषध विक्रेत्याच्या दुकानातून नाही हे प्रामुख्याने आपण समजून घेतले पाहिजे.
या जगात रुग्णालये ही वैज्ञानिक (शास्त्रोक्त ) वैद्यकशास्त्राचे फक्त प्रवेशद्वार आहे. प्रथम निरीक्षण क्षेत्र आहे, ज्यामध्ये डॉक्टर येतात पण वैद्यकीय शास्त्राचे खरे आश्रयस्थान आहे ते लॅब्रॉटरीज, फक्त तिथेच प्रायोगिक विश्लेषणाची साधने वापरून सामान्य आणि पॅथॉलॉजीकल अवस्थांमधील आयुष्याचा शोध घेतला जातो. पीजी डीएमएलटी कोर्समध्ये तुम्हाला लॅब टेस्टिंग बद्दल वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. लॅबमध्ये टेस्ट करून लॅब टेक्निशियन डॉक्टरला आजाराचे निवारण करण्यास मदत करतो.
पीजी डीएमएलटी कोर्समध्ये तुम्हाला शरीररचना, शरीरशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जीवनशास्त्र, रक्तवाहिन्यासंबंधी विषय शिकवले जातात. शरीरशास्त्रात तुम्हाला हाडे आणि शरीराच्या अवयवांबद्दल शिकवले जाते. शरीरविज्ञान मध्ये आपल्याला विविध महत्वाच्या अवयवांबद्दल शिकवले जाते. सूक्ष्मजीवशास्त्र मायक्रोबायोलॉजीमध्ये आपल्याला बॅक्टिओलॉजी, विषाणूशास्त्र, परजीवी विज्ञान, बुरशीचे आणि डाग-डागांबद्दल शिकवले जाते. जीवशास्त्रात तुम्हाला अजैविक रसायनशास्त्र, द्रावण तयार करणे, सेंद्रिय रसायनशास्त्र, जैवरासायनिक नमुना संग्रह, प्लाझ्माचे पृथक्करण, मूत्र आणि मलची रासायनिक तपासणी याबद्दल शिकवले जाते. पॅथॉलॉजीमध्ये आपल्याला नमुने गोळा करणे, एचबी, आरबीसी गणना, लेबलिंग, अहवाल देणे आणि अहवाल पाठविणे शिकविले जाते.
यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल कि, पीजी डीएमएलटी कोर्समध्ये तुम्हाला काय शिकवले जाईल. लक्षात राहू द्या कि, हा फक्त अभ्यासक्रमाचा सारांश आहे, तुम्हाला पीजी डीएमएलटी कोर्समध्ये याबद्दल भरपूर काही शिकवले जाईल. पीजी डीएमएलटी कोर्स पूर्ण झाला म्हणजे तुम्ही लॅब टेक्निशीन म्हणून काम करण्यासाठी पात्र होतात. कोर्स झाल्यावर तुम्ही नोकरी करू शकता. तुम्हाला लॅब टेक्नॉलॉजिस्ट, लॅब टेक्निशिअन, किंवा लॅब वर्कर म्हणून नोकरी भेटेल. तसेच तुम्ही सरकारी किंवा खाजगी दवाखान्यामध्ये नोकरी करू शकता. नर्सिंग होम मध्ये लॅब टेक्निशियन म्हणून नोकरी करू शकता. फार्मा कंपनी किंवा मेडिकल कंपनीच्या वेगवेगळ्या लॅबमध्ये काम करू शकता. तुम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये देखील काम भेटते. हा कोर्स १.५ वर्षाचा असून त्यात २ सेमिस्टर्स असतात. या सेमिस्टर नंतर ६ महिन्याची इंटर्नशिप सरकार मान्य पॅथॉलॉजी लॅबमध्ये करावी लागते.
भारतासारख्या विशाल लोकसंख्या असलेल्या देशात रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा देण्यासाठी चांगल्या प्रशिक्षित डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, पॅथॉलॉजिस्ट या सर्व घटकांची खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत आहे. सध्याच्या कोरोना विषाणूच्या प्राश्वभूमीवर अवघे जग चिंताग्रस्त असून रुग्णांना अतिजलत सर्व ते उपचार मिळणे आवश्यक आहेत. याबरोबरच वैद्यकीय मनुष्यबळ यामध्ये सर्व प्रकारच्या कोरोना योध्याची आवश्यकता भासत आहे.
या सर्व बाबींची आवश्यकता पाहता फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी आपल्या कॅम्पसमध्ये पीजी डीएमएलटी हा कोर्से केला असून याला शासनाची मंजुरी मिळाली आहे. हा लेख लिहण्यामागे हा हेतू आहे कि, सध्या बी. एससी. पास आऊट विद्यार्थी मोठ्या संख्येने बेरोजगार आहेत. यातील काही विद्यार्थी हा कोर्से पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी करू शकतात किंवा आपली स्वतःची लॅब टाकू शकतात . या कोर्सकरिता पात्रता हि बी.एस्सी पदवी असावी लागते. यामध्ये बॉटनी, मायक्रोबियॉलॉजि, झूलॉजि, केमिस्ट्री, बायोलॉजि, बायोटेक्नॉलॉजि यापैकी कोणत्याही एका विषयाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फक्त मॅथ्स व फिजिक्स हे विषय सोडून इतर सर्व विद्यार्थी या कोर्सकरिता पात्र ठरतात.फॅबटेक महाविद्यालयांमध्ये सुसज्य लॅब्स, क्लासरूम्स, लायब्ररी, अनुभवी प्राध्यापक वर्ग या सर्व बाबींचा विचार करता विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा . लेखक: डॉ.संजय बैस ( प्राचार्य )
फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी,सांगोला.