Uncategorized

सहकार आयुक्त अनिल कवडे यांची पंढरपूर अर्बन बँकेला वर्धापनदिनानिमित्त सदिच्छा भेट

सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून प्रसिध्द असलेल्या दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूरला महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक (भा.प्र.से.) मा.श्री.अनिलजी कवडेसाहेब यांनी भेट देवून 109 व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देवून बँकेचे कामकाजाबाबत समाधान व्यक्त करीत काही महत्वपूर्ण सूचना दिल्या. यावेळी त्यांचा तुळशीहार घालून सत्कार बँकेचे चेअरमन आ.प्रशांत परिचारक यांनी केला.

भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये असणारे श्री.अनिलजी कवडे साहेब, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांनी शतकोत्तर वाटचाल करीत असलेल्या पंढरपूर अर्बन बँकेस सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासकीय अधिकारी श्री.शैलेश कोथमिरे यांनी बँकेचे व्यवस्थापकीय अधिकारी यांचेशी चर्चा करीत आर्थिक परिस्थिती उत्तम असून कोविड लॉकडाऊन काळात थांबलेले वसुलीचे कामकाज अधिक प्रभावी करणेबाबत व कर्ज वाटप वाढविणेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उदाहरण देत सर्वोतोपरी सहकार्य करणेचे आश्वासन दिले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांनी मे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मार्गदर्शक धोरणानुसार करीत असलेले कामकाजाची माहिती, कोविड 19 च्या काळात लहान मोठे व्यावसायिक, रोजदांरी काम करणारे सर्वसामान्य जनता यांचेसाठी आत्मनिर्भर, आत्मसन्मान या रू.10000/- व रू.50000/- पर्यंत वाटप केलेले कर्जाची माहिती तसेच कोविड 19 लॉकडाऊन काळात थांबलेले वसुली कामकाज यामध्ये सुरू केलेल्या कारवाईमध्ये येणाऱ्या अडचणी यांची माहिती सांगितली. यावर सहकार आयुक्त श्री.कवडे साहेब यांनी सहकारी संस्था व निबंधक यांचेव्दारे थकीत कर्जदारांची त्वरीत वसुली दाखले, जप्तीबाबत जास्तीत जास्त सहकार्य करणेचे आश्‍वासन दिले.

चेअरमन आ.प्रशांत परिचारक व सीए श्री.बजाज यांनी बँकेचे अधिकारी व कर्मचारी व्यवसाय वृध्दी, वसुली याबाबत नियोजनात्मक करीत असलेले कामकाज याचा आढावा सांगितला. यावेळी आ.परिचारक यांचे हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचा श्री पांडुरंगाची प्रतिमा, ग्रंथ देवून यथोचित सन्मान करणेत आला.याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक श्री.कुंदन भोळे, जिल्हा लेखापरिक्षक व्ही.व्ही.डोके बँकेचे तज्ञ संचालक सीए राजेंद्र बजाज, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, सरव्यवस्थापक श्री.राम उन्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *