Uncategorized

फॅबटेक ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे सीईटी व नीट परीक्षेमध्ये उज्वल यश

 फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी सीईटी व नीट परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे. मेडिकल अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी नीट परीक्षा चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण होणे आवश्यक असते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी  अखंड परिश्रम आणि मेहनतीची गरज असते. वेळेचे नियोजन  आणि आत्मविश्वास यावरच विद्यार्थी नीट परीक्षा यशस्वी पास होऊ शकतात.फॅबटेक  ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी हाच मंत्र लक्षात ठेवून सीईटी व नीट परीक्षेत  सुयश मिळवले आहे. कुमारी साक्षी पवार हिस सीईटी मध्ये ९०, नीट परीक्षेमध्ये २२४  गुण मिळाले तर रितेश पवारला नीट परीक्षेमध्ये  २२१  गुण मिळाले असून  या दोन विद्यार्थ्यांना एमबीबीएस  अभ्यासक्रमासाठी  रशियाला ऍडमिशन मिळाले आहे. कुमारी जास्मिन पटेलला सीईटी परीक्षेत ९३ गुण, कुमारी अमृता नांगरेला  ८७ गुण, तर कुमारी मयुरी पवारला ८५ गुण मिळाले.

या सर्व विद्यार्थ्यांनी  कॉलेजच्या यशाची उज्वल परंपरा  राखली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री.भाऊसाहेब रुपनर यांनी  अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी  संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अमित रूपनर, श्री. दिनेश रूपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील यांनीहि  विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *