Uncategorized

सिंहगडच्या चार विद्यार्थ्यांची “ऑटोस ग्लोबल आयटी सोल्युशन्स” कंपनीत निवड

औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन अपेक्षित शैक्षणिक सुविधा व नवीन मुल्यवर्धित कार्यशाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व औद्योगिक तंत्रज्ञानाशी अनुसरून विकास झाल्यामुळे तसेच महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंट यांचा स्वतंत्र विभाग असल्यामुळे पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आज मोठ्या प्रमाणावर नामांकित कंपनीत निवडला जात आहे. चालू शैक्षणिक वर्षांतील चार विद्यार्थ्यांची “ऑटोस ग्लोबल आयटी सोल्युशन्स” कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.

“ऑटोस ग्लोबल आयटी सोल्युशन्स” प्रा. लिमिटेड कंपनी ही भारतातील साॅफ्टवेअर कंपनी आहे. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील तुषार निंबाळकर, मैथली महाकोडे, निकीता घाडगे आणि इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील लखन लेंडाल आदी चार विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली असून कंपनीकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३.१० लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.

“ऑटोस ग्लोबल आयटी सोल्युशन्स” कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. योगिनाथ कलशेट्टी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *