Uncategorized

वेळात वेळ काढत अजितदादा नागेश भोसलेंच्या भेटीला !

गेल्या जवळपास सात वर्षांपासून पंढरपूर नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदाची सूत्रे आपल्या हाती ठेवत सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहणाऱ्याचा गेल्या वीस वर्षातील उचांक मोडणाऱ्या पंढरपूर नगर पालिकेच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती आणि पंढरपूर नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले हे गेल्या काही वर्षात पंढरपूर शहरातील एक प्रभावी राजकीय नेते ,म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत,मिठ्ठास वाणीने कुठल्याही समस्येवर जागच्या जागी तोडगा […]

Uncategorized

समाधान आवताडेंच्या विजयासाठी आ.प्रशांत परिचारक यांच्या मॅरेथॉन बैठकांना पंढरपुरात सुरुवात 

२५२ पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजापाचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनी आज पंढरपूर शहरातील भाजपचे काही पदाधीकारी,नगरसेवक यांच्यासह शहरातील विविध भागातील आपल्या समर्थकांना या निवडणुकीसाठी अलर्ट मोडवर राहून कुठलाही हलगर्जीपणा न करता व गेल्या पाच -सहा वर्षाच्या कालावधीत आमदार प्रशांतराव परिचारक यांनी महायुतीच्या […]

Uncategorized

पोटनिवडणुकीत नागेश काकांच्या उमेदवारीने धोका कुणाला ?

पंढरपूर नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते हि निवडणूक लढविणारच असा दावा त्यांचे सर्मथक करताना दिसून येत आहेत तर स्वतः नागेश भोसले यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना स्व.आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सांगत भाजपने आमदार प्रशांत […]

Uncategorized

बँकेतील कर्मचाऱ्यानेच घातला खातेदारांना गंडा 

 बँकेच्या कर्मचाऱ्यानेच खातेदारांच्या खात्यातील रक्कमेवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमधील  एका बँकेत घडला आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे बँकेतील रक्कमेवर डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्याला एक हात नाही, तो अपंग आहे. तरी देखील त्याने चोरीचं एवढं मोठं धाडस केलं. त्याच्या या कारनाम्यामुळे पोलिसांनी बँकेतून त्याची रवानगी थेट पोलीस ठाण्याच्या कोठडीत केली आहे. अंबरनाथ पश्चिम भागात स्टेशन […]

Uncategorized

यंदा मतविभागणीचा फटका कुणाला बसणार ? 

२०१९ मध्ये झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या निवडणुकीत स्वर्गीय आमदार भारत भालके यांनी स्वर्गीय माजी आमदार सुधाकरपंत यांना १३ हजार ३६३ मतांनी पराभूत केले होते.अतिशय चुरशीच्या झालेल्या या लढतीत समाधान आवताडे यांना ५४ हजार १२४ मते मिळाली होती.यावेळी समाधान आवताडे आणि परिचारक हे भाजपच्या झेंड्याखाली एकत्र आले असून भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी देऊन मतविभागणी टाळत […]

Uncategorized

आता नागेश भोसले काय भूमिका घेणार याकडे परिचारक समर्थक आणि पंढरपूर शहराचे लक्ष 

२५२ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आता केवळ दोन दिवसाचा कालावधी बाकी असतानाच ज्या परिचारक गटाचे नेते म्हणून नागेश भोसले हे ओळखले जातात त्या परिचारक गटाने भाजपा पक्षश्रेष्ठी देतील तो निर्णय मान्य करणार असल्याची भूमिका या गटाचे नेते आ.प्रशांत परिचारक यांनी जाहीर केली आहे.मात्र याच वेळी परिचारक गटाचे खंदे समर्थक आणि माजी […]

Uncategorized

समाधान आवताडेंना भाजपाची उमदेवारी,परिचारकांची अग्निपरीक्षा !

२५२ पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी कोणाला याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या महिनाभरापासून होत असतानाच आज अखेर भाजपाकडून समाधान आवताडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणात विजय पताका फडकावण्यासाठी परिचारक प्रणित पांडुरंग परिवार आणि आवताडे प्रणीत दामाजी परिवार हातात हात घालून काम करणार असल्याचे दिसून येत आहे.काही दिवसापूर्वी भाजपचे नेते […]

Uncategorized

संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय,धार्मिक मेळावे घेण्यास प्रतिबंध 

सर्व प्रकारच्या राजकीय आणि धार्मिक मेळाव्यांना शनिावारी राज्य सरकारने पुढील सुचना येईपर्यंत बंदी घातली आहे. त्याच बरोबर मॉल आणि रेस्टॉरंट तसेच उद्यानेही रात्री आठ ते सकाळी सात पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यांत गेल्या काही दिवसांत करोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर केले आहे शनिवारी राज्यात करोनाचे बाधित सापडले. देशांत सापडणाऱ्या बाधितांमध्ये राज्यातील बाधितांचे प्रमाण […]

Uncategorized

युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांच्या इशाऱ्याची कॉग्रेस श्रेष्ठी दखल घेणार ?

252 पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रवादी कॉग्रेसचा उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित मानले जात असतानाच युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी हि जागा कॉग्रेसला सोडण्यात यावी अशी मागणी कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठाकडे करणार असल्याचे सांगत जर या बाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर येथील कॉग्रेसचे नेते वेगळा विचार केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही नागणे यांनी दिला […]

Uncategorized

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे राज्याच्या मुख्यसचिवांना पत्र 

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचे कायर्कारी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील आणि सोलापूर ग्रामीणचे माजी पोलीस आयुक्त मनोज पाटील व राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त सुहास बावचे यांच्यात झालेल्या संभाषणाचा सीडीआर तपासण्यात आल्याची माहिती राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी असताना रश्मी शुक्ला यांनी गोपनीय अहवालात नमूद  केल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उमेश पाटील यांची मोठी बदनामी […]