Uncategorized

वेळात वेळ काढत अजितदादा नागेश भोसलेंच्या भेटीला !

गेल्या जवळपास सात वर्षांपासून पंढरपूर नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदाची सूत्रे आपल्या हाती ठेवत सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहणाऱ्याचा गेल्या वीस वर्षातील उचांक मोडणाऱ्या पंढरपूर नगर पालिकेच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती आणि पंढरपूर नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले हे गेल्या काही वर्षात पंढरपूर शहरातील एक प्रभावी राजकीय नेते ,म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत,मिठ्ठास वाणीने कुठल्याही समस्येवर जागच्या जागी तोडगा काढण्याचा त्यांचा हातखंडा हा गेल्या काही वर्षात चर्चेचा विषय ठरला होता.२०११ च्या पंढरपूर नगर पालिकेच्या निवडणुकीत शहरातील जनतेने भालके सर्मथकांच्या हाती नगर पालिकेची सत्ता दिली खरी पण अडीच वर्षातच हि सत्ता उलथवून टाकली गेली आणि नागेश भोसले हे किंगमेकर म्हणून ओळखले जाऊ लागले.मराठा आरक्षण आंदोलनाचे  पंढरपुरातील एक प्रभावी समन्वयक म्हणून जसे ते ओळखले जातात तसेच नगर पालिकेच्या विरोधातील जनतेचा कुठलाही आक्रोश समाधानात बदलण्यातही ते पटाईत असल्याचे मानले जाते.नागेश भोसले हे विधानसभा निवडणूक लढविणार अशी चर्चा २०१९ च्या निवडणुकीपासून होत आली असली तरी नगर पालिकेच्या माध्यमातून अधिक विकास करता येतो याची जाणीव झाल्यानेच ते विधानसभा निवडणुकीपासून दूर राहिल्याची चर्चा होत आली.     

 हि पोटनिवडणूक नागेश भोसले लढवणार अशी चर्चा गेल्या दोन महिन्यापासून होत आली,नागेश भोसलेंनी उमेदवारी अर्जही भरला पण पुढे तो अपेक्षेप्रमाणे काढून घेतला.या पोटनिवडणुकीत नागेश भोसले यांची काही मदत होईल का या हेतूनेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी नागेश भोसले यांच्या घरी जावून त्यांची गुरुवारी रात्री  भेट घेतली आणि या भेटीनंतर नागेश भोसले हे काय  भूमिका घेणार याच्या चर्चेला पंढरपुरात सुरुवात झाली.               

           २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कुठल्या प्रभागातील कुठल्या बुथवरून स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांना कमी मते मिळाली याची याचे सारे रेकॉर्ड हाती घेऊन आमदार प्रशांत परिचारक यांनी भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना शहरातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळाले पाहिजे यासाठी कंबर कसली आहे.अशावेळी परिचारक गटाच्या दुसऱ्या फळीतील शहरातील क्रमांक एकचे नेते समजले जाणारे पंढरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले यांची समाधान आवताडे यांना शहरातून मताधिक्य मिळवून देण्यात मोठी जबाबदारी असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे थेट नागेश भोसले यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतात,यावेळी पंढरपूर नगर पालिकेच्या नगराध्यक्षा साधना भोसले याही उपस्थित असतात आणि निवडणूक प्रचार सुरु असताना वेळात वेळ काढून अजितदादा हे भोसले कुटूंबाची भेट घेतात हि बाब या पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या समर्थकांसाठी नक्कीच टेन्शन वाढवणारी आहे अशीच प्रतिक्रया पंढरपुरच्या राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.               

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *