Uncategorized

युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांच्या इशाऱ्याची कॉग्रेस श्रेष्ठी दखल घेणार ?

252 पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रवादी कॉग्रेसचा उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित मानले जात असतानाच युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी हि जागा कॉग्रेसला सोडण्यात यावी अशी मागणी कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठाकडे करणार असल्याचे सांगत जर या बाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर येथील कॉग्रेसचे नेते वेगळा विचार केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही नागणे यांनी दिला आहे.

२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी भारत भालके याना जाहीर झालेली असतानाही कॉग्रेसकडून शिवाजी काळुंगे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता.पुढे काळुंगे यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणण्यात आला पण त्यांची उमेदवारी कायम राहिली.व हाताचा पंजा या कॉग्रेसच्या चिन्हावर ते लढले.पंढरपूरच्या सभेत सुशीलकुमार शिंदे यांनी या बाबत स्पष्टीकरण देत आम्ही भालके यांच्यासोबत असल्याचे सांगितले आणि केवळ ७ हजारच्या आसपास मते घेऊन काळुंगे पराभूत झाले.मंगळवेढा येथील जनसंवाद सभेत कॉग्रेसच्या नेत्या आमदार प्रणितीताई शिंदे यांनी आपल्याला पुढच्या भगिरथदादांना आमदार झालेलं पाहायचाय अशी अपेक्षा व्यक्त केली असतानाच आता त्यांच्याच पक्षाच्या नितीन नागणे यांनी विसंगत भूमिका मांडल्याने नागणे यांचा बोलविता धनी कोण याची चर्चा मतदार संघात होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *