Uncategorized

यंदा मतविभागणीचा फटका कुणाला बसणार ? 

२०१९ मध्ये झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या निवडणुकीत स्वर्गीय आमदार भारत भालके यांनी स्वर्गीय माजी आमदार सुधाकरपंत यांना १३ हजार ३६३ मतांनी पराभूत केले होते.अतिशय चुरशीच्या झालेल्या या लढतीत समाधान आवताडे यांना ५४ हजार १२४ मते मिळाली होती.यावेळी समाधान आवताडे आणि परिचारक हे भाजपच्या झेंड्याखाली एकत्र आले असून भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी देऊन मतविभागणी टाळत राष्ट्रवादीच्या उमेदवारास पराभूत करण्याची व्यूहरचना केली आहे.आवताडे आणि भालके यांच्यात चुरशीचा सामना होईल अशी शक्यता वर्तविली जात असतानाच शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार शैला गोडसे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढविणारच असा निर्धार व्यक्त केला आहे.मागील काही वर्षात शैला गोडसे यांनी मतदार संघातील विविध प्रश्नासाठी केलेला संघर्ष आणि निर्माण केलेला जनसंर्पक लक्षात घेता शैला गोडसे यांची उमेदवारी मतविभागणीचा विचार करता आवताडे आणि भालके यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते अशी शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.     

    २०१९ च्या निवडणुकीत स्वर्गीय आमदार भालके,स्वर्गीय माजी आमदार सुधाकरपंत परिचारक आणि समाधान आवताडे या प्रभावी उमेदवारात चुरशीची लढत झाली असली आणि १३ हजार ३६३ मतांनी भालके विजयी झाले तरी १६ उमेदवारांनी १८ हजार ५८२ मते घेतली होती.यात कॉग्रेच्या हाताचा पंजा या चिन्हावर निवडणूक लढविलेले शिवाजी काळुंगे यांना केवळ ७२३२ मते मिळाली होती.   

यावेळी धनगर समाज स्वतंत्र उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे तर शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार शैला गोडसे यांनी निर्माण केलेला मोठा लोकसंर्पक या निवडणुकीत मतांमध्ये परावर्तित करण्यासाठी त्या जोरदार तयारी करत आहेत तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख निर्माण केलेले सचिन पाटील हेही या निवडणुकीत आपल्या आक्रमक प्रचार शैलीने सर्वसामान्य शेतकऱ्यांची दुरावस्था मांडत मतदारांचे मनपरिवर्तन करण्यासाठी मोठी भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे हि निवडणूक कुणालाच सोपी नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसून येत आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *