नालासोपारा, 20 एप्रिल : कोरोनाच्या महामारीत रेमडेसीवीरची मागणी वाढल्याने त्याचा काळाबाजार करून रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक करून लुटारू सक्रीय झाले होते. नालासोपारा येथील महिलेने दिलेल्या माहितीमुळे रेमडेसीवीरचा काळाबाजार उजेडात आला आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एका त्रिकुटाला अटक करून 3 इंजेक्शन व 3 मोटारसायकल जप्त केल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपूर्वी धानीव बाग येथील […]
Tag: #corona
राज्यातील तुरुंगांमध्ये कोरोनाचा स्फोट, धक्कादायक आकडेवारी समोर!
मुंबई, 20 एप्रिल : कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीचं संकट समोर उभं ठाकलेलं असतानाच आता सरकारसमोर आणखी एका संकटानं डोकं वर काढलं आहे. ते म्हणजे राज्यातील तुरुंगांमध्ये असलेल्या रुग्णांना होणारा कोरोना संसर्ग. राज्यातील अनेक कारागृहांमध्ये कोरोनाचा स्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कैद्यांबरोबरच तुरुंगातील कर्मचारीही मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्त असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातल्या विविध कारागृहांमध्ये सध्या कोरोनाग्रस्त कैद्यांच्या […]
मोठी बातमी! राज्यात कडक लॉकडाऊन लागणार
मुंबई- राज्यात कठोर निर्बंध लावून सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली नाही. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. काही तासांत लॉकडाऊनबाबतच्या गाईडलाईन्स जारी करण्यात येतील, असंही ते म्हणाले आहेत. दुसरीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं म्हटलं आहे. त्यामुळे […]
रेमडेसिवीर’चा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी – प्रांताधिकारी गजानन गुरव
पंढरपूर, दि. 20 :- तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची वाढ मोठ्याप्रमाणात होते आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्राशानाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तसेच कोरोना बाधित रुग्णांना आवश्यकतेनुसार देण्यात येणारे रेमडेसिवीर इंजेक्शन बाबत खाजगी रुग्णालयांनी कोविड नियमांचे तंतोतंत पालन करावे , या इंजेक्शनचा कुठेही काळाबाजार अथवा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना […]
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 50 टक्के लस द्याव्यात
पंढरपूर- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली असून यामुळे या दोन्ही तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे येथील जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर लसी पैकी पन्नास टक्के लसीकरण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात करावे अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे […]
आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार
कोरोना लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून लसीकरणाचा पुढचा सर्वात मोठा टप्पा आता सुरू होणार आहे. ज्यामध्ये 18 पुढील सर्व वयाच्या लोकांना लस दिली जाणार आहे. देशात जानेवारीपासून लसीकरण सुरू झालं. टप्प्याटप्प्याने […]
धक्कादायक! कोरोना रुग्णावर मांत्रिकाकडून उपचार; महिलेचा मृत्यू
अमरावती, 17 एप्रिल: महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचा मेळघाट परिसर अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. याठिकाणी अंद्धश्रद्धेला खातपाणी घालणाऱ्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली असून मेळघाटात कोरोनाबाधित रुग्णावर एक मांत्रिक उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनाबाधित महिलेवर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्यानं ही घटना […]
पोलिसांवर दबाव योग्य नाही, वळसे पाटलांनी दिले फडणवीस-दरेकरांवर कारवाईचे संकेत
मुंबई, 18 एप्रिल : राज्यात एकीकडे रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. मुंबई पोलिसांनी ब्रुफ्र फार्माच्या संचालकाला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी हस्तक्षेप करणे योग्य नव्हते, असं म्हणत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कारवाईचे संकेत दिले आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलत […]
खाजगी रुग्णालयातील उपचाराचे दर नियंत्रणात ठेवा – ना. विजय वडेट्टीवार
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून मृत्यूचे प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रुग्णांच्या उपचारासाठी खाटांची संख्या कमी पडत आहे. खाजगी रुग्णालयात कोविड उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून शासनमान्य दराने बिलाची आकारणी होते की नाही ते तपासा व खाजगी रुग्णालयातील उपराचाराचे दर नियंत्रणात ठेवा,असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिले. […]
राज्यात आजपासून संचारबंदी लागू
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल रोजी संध्याकाळी ८.३० वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी राज्यात १४ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. त्यामध्ये या काळात संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यातून जीवनावश्यक सेवा किंवा […]