ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू -मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार 27 जानेवारी 2021 पासून जिल्ह्यातील 5 वी ते 8 वीच्या शाळा सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्हा परिषदमध्ये शाळा सुरू करण्याबाबत तयारीच्या आढावा बैठकीत श्री. स्वामी बोलत […]

ताज्याघडामोडी

पुण्याकडून सोलापूरला जाणारी वाहतूक बंद

17 जानेवारी : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ एमआयडीसी जवळ केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आहे. टँकर महामार्गावरून बाजूला करताना आग लागण्याची शक्यता असून पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी सहा क्रेन आणि अग्निशमन दलाच्या तीन गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. टँकरमध्ये ज्वलनशील केमिकल असण्याची शक्यता असल्याने पलटी झालेल्या टँकरला बाजूला करण्यासाठी खबरदारी म्हणून क्रेन […]

ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांना गिरणा गौरव पुरस्कार जाहीर

    नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा अत्यंत मानाचा गिरणा पुरस्कार सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना आज जाहीर झाला आहे. नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा दरवर्षी १४ जानेवारी रोजी जाहीर केली जाते व ५ एप्रिल ला पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातात.या कार्यक्रमाचे २३ वे वर्ष […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

अखेर जिल्ह्यातील भाजपचा तो बडा नेता निलंबित

सोलपूर : उपायुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आलेली. त्यानंतर राजेश काळे यांची आज (13 जानेवारी) भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी याबाबत घोषणा केली. राजेश काळे यांच्यावर महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना र्वाच्य भाषेत शिवीगाळ करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात […]

ताज्याघडामोडी

जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम

सोलापूर, दि.13: सोलापूर जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 30 हजार 184 आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लस दिली जाईल. लसीकरण मोहिमेसाठी सर्व प्राथमिक तयारी झाली असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले. पालकमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड लसीकरणाबाबत बैठक झाली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला […]