ताज्याघडामोडी

 मार्चमध्ये 11 दिवस बँका बंद

मुंबई : फेब्रुवारी महिना संपत आला आहे. जर आपण पुढच्या महिन्यासाठी म्हणजेच मार्च  (March) महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही कामे असतील आणि तुम्ही ती पुढे ढकलणार असाल तर एकदा कॅलेंडर पाहा. कारण आपण ज्या दिवशी बँकेत जाण्याचा विचार करीत आहात त्या दिवशी, बँकेला कुलूप दिलेस. म्हणून आधीच हे जाणून घेणे चांगले आहे की मार्चमध्ये कोणत्या दिवस बँका बंद राहणार आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) हॉलिडे कॅलेंडरनुसार मार्चमध्ये होळी आणि महाशिवरात्रीसह एकूण 11 दिवस बँकांमध्ये सुट्टी असेल. त्यापैकी 5 मार्च, 11 मार्च, 22 मार्च, 29 मार्च आणि 30 मार्च रोजी बँकाना सुट्टी असेल. त्याशिवाय रविवार आणि दुसऱ्या शनिवारीही बँका बंद राहतील. म्हणजेच, एकूण 11 दिवस बँकांमध्ये काम होणार नाही.या सुट्ट्यांव्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावित खासगीकरणाच्या निषेधार्थ बँक कर्मचार्‍यांच्या 9 संघटनांच्या (UFBU) सर्वोच्च संस्थेने 15 मार्चपासून दोन दिवसांचा संप (two-day strike)जाहीर केला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणात (budget speech) निर्गुंतवणूक कार्यक्रमांतर्गत दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली आहे. याचा निषेध म्हणून बँकिंग संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे.मार्च 2021-22 चे नवीन आर्थिक वर्ष मार्चच्या सुरूवातीस सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत सुट्टीमुळे बँकेच्या शाखा बंद राहिल्या तरीही आपण इंटरनेट बँकिंगद्वारे आपल्या बरीच कामे करु शकता. आरबीआयने स्पष्ट केले आहे की, राज्यांमध्ये बँकांच्या सुट्ट्या बदलू शकतात. म्हणूनच, सर्व ग्राहकांनी हे लक्षात घेऊन बँकिंगशी संबंधित त्यांच्या कामाची योजना आखली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *